कंगनाच्या कार्यालयावर कारवाईसाठी मनपा कर्मचारी दाखल; अनधिकृत बांधकामावर हातोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, कंगनाच्या कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”.

तर दुसरीकडे कंगना रणौत चंदीगढला विमानतळावर दाखल झाली असून थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “मुंबई दर्शन घेण्यासाठी मी विमानतळाच्या दिशेने प्रवास करत आहे. यावेळी महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या संपत्तीजवळ बेकायेदशीरपणे कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी रक्त देण्यासाठीही तयार आहे, हे काहीच नाही. सर्व घेऊ शकता पण माझं उत्साह वाढत राहील,” असं कंगनाने ट्विट करत म्हटलं आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता असून त्यानिमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचा फोटो ट्विट करत कंगनाने टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment