Thursday, March 23, 2023

अभिनेत्री ‘किशोरी बलाल’ काळाच्या पडद्याआड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या.  किशोरी बलाल यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं होतं.  त्यांनी बॉलिवूड चित्रपट ‘स्वदेस’मध्ये कावेरी अम्मा ही भूमिका साकारली होती.

किशोरी बलाल यांनी १९६० मध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. ‘स्वदेस’, ‘अय्या’ आणि ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटातही काम केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान किशोरी बलाल यांच्या निधनामुळे प्रचंड दु:ख होत आहे. तुमच्या स्वभावातला दयाळूपणा, सहृदयपणा आणि प्रेम यामुळे कायम तुम्ही आमच्या लक्षात रहालं. तसंच स्वदेसमधील तुम्ही साकारालेली कावेरी अम्मा कायम आठवणीत राहण्यासारखी आहे. खरंच तुमची फार आठवण येईल”, अशी पोस्ट आशुतोष गोवारीकरने शेअर केली आहे. सोबत किशोरी बलाल यांचा फोटोही शेअर केला आहे.