हॅपी बर्थडे धकधक गर्ल; प्रेमात पडली आणि मिस दीक्षितची झाली मिसेस नेने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सर्वात सुंदर अभिनेत्री आणि मनावर राज्य करणारी धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितचा आज ५४वा वाढदिवस आहे. अगदी ९०च्या काळापासून तीने बॉलिवूडवर राज्य केले आहे. तिने नेहमीच एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. यामुळे माधुरी दीक्षित धकधक गर्ल कधी झाली तेच कळलं नाही. वयाच्या १७व्या वर्षांपासून तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही आणि थांबलीही नाही. उलट पडली… ते हि प्रेमात, आणि झाली मिसेस नेने.

https://www.instagram.com/p/CLQtEvRHFzD/?utm_source=ig_web_copy_link

माधुरी प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आहे. मात्र कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणार्‍या माधुरीचे हृदय डॉ. श्रीराम नेने यांच्यावर आले. यामुळे माधुरी दीक्षित झाली मिसेस श्रीराम नेने. एका पार्टीदरम्यान माधुरी-श्रीराम यांची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रेमकथा सुरू झाली, त्यांच्या प्रेमकथेबद्दल चाहत्यांना अनेकदा प्रश्न पडत असतात.

https://www.instagram.com/p/B8iujwsnrdh/?utm_source=ig_web_copy_link

अशाच एका मुलाखतीत स्वत: माधुरीने तिच्या प्रेमकथेविषयी सांगितले होते. श्रीराम नेनें यांच्याशी पहिली भेट कशी झाली सांगताना माधुरी म्हणाली की, त्यांची भेट हा केवळ योगायोग होता. दोघांची पहिली भेट माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर झाले प्रेमात. पुढे घरच्यांच्या संमतीने या दोघांची लग्नगाठ १९९९ साली बांधली गेली.

https://www.instagram.com/p/CLLmBdjH7jO/?utm_source=ig_web_copy_link

सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी तिच्या आई-वडिलाची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी वर शोधण्यास सुरुवात केली. यादरम्यान माधुरीच्या माता-पित्यांनी तिच्यासाठी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे स्थळ आणले होते. मात्र सुरेश वाडकर यांनी माधुरी खूपच सडपातळ आहे म्हणत तिला नकार दिला. त्यामुळे माधुरी मिसेस वाडकर झाली नाही. त्यांनी होकार दिला असता तर कदाचित माधुरीचे लग्न त्यांच्यासोबत झाले असते आणि तिची अशी वेगळी प्रेमकहाणी झाली नसती.

https://www.instagram.com/p/CGbvHzqKDKL/?utm_source=ig_web_copy_link

वाडकरांच्या नकारानंतर माधुरीने अभिनय क्षेत्रात धुराळा केला. एकापेक्षा एकी हटके चित्रपट देत माधुरी झाली धकधक गर्ल. आज माधुरी दीक्षित- नेने हे नाव बॉलिवूड जगतातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. इतकेच नव्हे तर माधुरीचे सौन्दर्य, निखळ हास्य, तिच्या अदा आजही लोकांना तितक्याच घायाळ करतात. आजही तिच्या चाहत्यांची तिची जागेपणी स्वप्न पडतात. आजहि माधुरी अभिनय क्षेत्रात तितक्याच जोमाने कार्यरत आहे.

https://www.instagram.com/p/CNzr30RnJOe/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या फिटनेस बाबत ती नेहमीच काळजी घेते आणि आपल्या चाहत्यांनाही काळजी घेण्यास प्रोत्साहित करते. तिच्या अभिनयासाठी आणि ती करत असलेल्या इतर प्रत्येक कामासाठी तिचे पती अर्थात डॉ. श्रीराम नेने नेहमीच तिचा खंबीर आधार म्हणून तिच्या पाठीशी उभे असतात. भले डॉ. नेने सेलिब्रिटी नसतील पण माधुरीसाठी ते नक्कीच सुपरहिरो पेक्षा कमी नाहीत. अशी हि हटके जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे.

Leave a Comment