अभिनेत्री माही विजच्या भावाचे कोरोनामुळे निधन; इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करीत सोनू सूदचे मानले आभार

Mahi Vij_Sonu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिकांच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाने माहीच्या अत्यंत जवळ असलेल्या तिच्या लहान भावाला हिरावून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र भाऊ बरा होऊन घरी परतेल, अशी माहीला अपेक्षा होती. मात्र १ जून २०२१ रोजी त्याच्या निधनाची बातमी तिला मिळाली. त्याच्या निधनानंतर माही अत्यंत दुखी आहे. मात्र माहीने एक भावुक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाची माहिती सर्वाना दिली आहे. इतकेच नव्हे तर सोबत भाऊ रूग्णालयात असताना मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदचेही तिने आभार मानले आहेत

https://www.instagram.com/p/CPz7uS-hAiw/?utm_source=ig_web_copy_link

माहीने या पोस्टमध्ये लिहिले कि, ‘माझ्या भावाला रूग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी आभारी आहे सोनू सर. मी खचले होते. अशात तुम्ही मला लढण्याचे बळ दिले, आशा दाखवली. माझा भाऊ बरा होऊन घरी परत येईल, अशी आशा मला होती. पण कदाचित तुम्हाला सत्य माहित होते. तुम्ही लोकांची मदत करत आहात. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना हिंमत आणि सकारात्मकता देण्यासाठीही मी तुमचे आभार मानते.’ आपल्या पोस्टमध्ये माहीने कॉमेडी क्वीन भारती सिंगचेही आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CPsV54Yhjce/?utm_source=ig_web_copy_link

भारती, तू रोज माझ्या भावाची काळजीने चौकशी करायचीस. व्हिडीओद्वारे मला पॉझिटीव्ह राहण्याची हिंमत द्यायचीस, तुझेही आभार, असे महिने लिहिले आहे. माहीने या पोस्टमध्ये सोनू सूदचे एक ट्वीटही टॅग केले आहे. सोनूने त्यात लिहिले आहे कि, एक २५ वर्षांचा मुलगा, ज्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. तो जगेल याची शक्यता फार कमी होती. पण तरीही मी रोज डॉक्टरांशी बोलायचो. मात्र हे त्याच्या कुटुंबाला सांगण्याची कधीच हिंमत झाली नाही.

https://www.instagram.com/p/CN2T20JBkoi/?utm_source=ig_web_copy_link

याआधी अगदी तीन दिवसांपूर्वीच माहि विजने तिच्या भावाचा एक फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट शेअर केली होती. यात तिने लिहिले होते कि, ‘मी तुला गमावले नाही तर मिळवले आहे. तू माझी ताकद आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि करत राहिन भाई. काश, मी काही दिवस मागे जाऊन तुला घट्ट मिठी मारू शकले असते आणि तुला कधीच जाऊ दिले नसते… आम्ही तुझ्यावर खूप खूप जास्त प्रेम करतो, पण कदाचित परमेश्वर तुझ्यावर आमच्यापेक्षा खूप अधिक प्रेम करत असावा… तू नेहमीच माझा हिरो असशील….,’ अशा आशयाची पोस्ट शेअर करीत माहिने आपल्या भावाला गमावल्याचे दुःख व्यक्त केले होते.