अभिनेत्री श्रिया पिळगावकर झाली पृथ्वी कन्या; फोटोशूट झाले वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी लोकप्रिय जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक सध्या पृथ्वी कन्या रूपात अवतरली आहे. अभिनेत्री श्रिया पिळगावकर भले सचिन आणि सुप्रिया यांची लेक असेल पण मराठी चित्रपटसृष्टीत तिने स्वबळावर नाव कमावले आहे. तीने अगदीच कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. श्रिया पिळगावकर लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राणा दुग्गाबती, पुलकित सम्राट आणि झोया हुसेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. ज्याचे कॅप्शन पृथ्वी कन्या असे असून हे फोटोज चांगलेच वायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CO2gqCjJLbX/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमीच स्वतःचे नवनवे फोटो शेअर करत असते. श्रियाने नुकतेच तिचे नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंमध्ये ती अगदीच ट्रेडिशनल लूकसोबत नाकात नथ अश्या वेशात दिसतेय. इतकेच नव्हे तर श्रेया नदीच्या किनारी बसलेली दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CO10tAhplPF/?utm_source=ig_web_copy_link

पृथ्वी कन्या असे कॅप्शन तिने या फोटोना दिले आहे. सध्या सोशल मिडियावर श्रेयाच्या या फोटोशूटची बरीच चर्चा रंगली आहे. हे फोटो पोस्ट केल्यावर क्षणार्धातच तिचे हे फोटो वायरल झाले आहेत. चाहत्यांकडून ​तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CO6wqK-pLZs/?utm_source=ig_web_copy_link

‘हाथी मेरे साथी’ या आगामी चित्रपटामध्ये श्रिया अरुंधती नामक एका तरुण पत्रकारिकेचे पात्र साकारत आहे. यातील अरुंधती हत्ती व त्यांचा अधिवास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर राणा बंडदेवची भूमिका साकारत आहे. ही एक अशी कथा आहे जी अनेक घटनांनी प्रेरित आहे. ज्याने आपल्या आयुष्याचा अधिकांश भाग जंगलामध्ये घालविला आहे, अशा व्यक्तीची (राणा डग्गुबाती) ही एक सुंदर वास्तवदर्शी कथा आहे. जी संपूर्णरित्या पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित आहे. हा चित्रपट २०२१ सालात प्रदर्शित होण्याची केवळ शक्यता वर्तविली जात आहे. हा चित्रपट तेलगूमध्ये ‘अरण्य’ आणि तामिळमध्ये ‘कदान’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment