अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या वडिलांचे निधन; इंस्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचे वडिल के.डी. चंद्रन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दरम्यान ते ८६ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून सतत आजारी होते. मुंबईतील जुहूत असणाऱ्या क्रिटीकेअर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर गेल्या बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला होता.वडिलांच्या निधनानंतर सुधा चंद्रन यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CO8Tl7lhGZt/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री सुद्धा चंद्रन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले कि, गुडबाय अप्पा..आपण पुन्हा भेटू … तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे …. मी तुम्हाला वचन देते, की मी तुमच्या तत्त्वांचे आणि अनुभवांचे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनुसरण करेन ..पण मला हे कबूल केलेच पाहिजे कि माझा एक भाग तुमच्याबरोबर गेला आहे अप्पा … रवी आणि सुधा लव्ह यू टू अनंतकाळ …. मी देवाकडे प्रार्थना करते की मी पुन्हा जन्म घेईन तर तुमची मुलगी म्हणून जन्माला येईन. ओम शांती

https://www.instagram.com/p/COmf_nIhv81/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. के.डी. यांनी अनेक चित्रपटांत काम केले होते. कोई मिल गया, चायना गेट, हम है राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, शरारात, हर दिल जो प्यार करेगा, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं या आणि अशी अनेक चित्रपटात ते विविध भूमिकेत झळकले होते. तसे पाहता के.डी. यांच्या वाट्याला अगदी लहान लहान भूमिका आल्या. पण या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची विशेष अशी छाप इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांवर सोडली होती.

https://www.instagram.com/p/CM_UDXIhgKa/?utm_source=ig_web_copy_link

के.डी. यांची लेक अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा अलग पण कमालीचा ठसा उमटवला. सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य आराधनेस सुरुवात केली होती. १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांचा अपघात झाल आणि त्या अपघातात त्यांनी स्वतःचा एक पाय गमावला होता. मात्र जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला. यानंतर नवे आयुष्य मिळाल्याप्रमाणे त्यांनी नव्या उमेदीने व नव्या जिद्दीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये अव्वल दर्जाच्या भूमिका केल्या आहेत. पण एक खलनायिका म्हणून त्यांनी प्रेक्षकांवर वेगळीच छाप उमटविली आहे.

Leave a Comment