दिल्ली विधानसभा2020: मतदानानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आज सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर मतदान पार पडत आहे. दुपार 3 वाजेपर्यंत दिल्लीत केवळ 41.5 टक्के मतदान झाले आहे. 2015 मध्ये इतक्याच वाजेपर्यंत 51.2 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. दोन्हींची तुलना करता मागच्या मतदानाच्या आकडेवारीत 10 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, मूळ दिल्लीचे रहिवाशी असलेल्या बॉलीवूड कलाकारांनी मतदान केलं आहे. यात अभिनेता जिशान अयुब, अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

प्रत्येक राजकीय मुद्द्यावर आपलं परखड मत व्यक्त करणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने मतदान केंद्रावरील आपला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेयर करताना स्वरा भास्करने कॅप्शनमध्ये लिहिले, “मतदान करण्याचं माझं काम संपलं, तुम्ही मतदान केलं का?” स्वरा भास्करच्या या ट्विटवर बरेच लोक ट्विटरवर कमेंट करत आहेत आणि त्यांचा अभिप्रायही देत आहेत.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही बॉलिवूडमधील अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांनी नागरिकता दुरुस्ती कायद्याचा आणि एनआरसीचा तीव्र विरोध दर्शविला आहे. याबद्दल स्वरा बर्‍याचदा ट्रोल झाली आहे. तसेच स्वरा भास्कर तिच्या ट्विटरवरील तिच्या ट्विटबद्दल नेहमीच चर्चेत असते. दिल्ली विधानसभेविषयी स्वराने केलेले ट्विटही खूप व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment