सेंट पीटर्सबर्गच्या रस्त्यावर तापसीचा पल्लू लटके; फोटो झाला वायरल

0
40
Taapsee Pannu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तापसी पन्नू एक अशी अभिनेत्री आहे जी चर्चेत असते मात्र ऐर्या गैऱ्या विषयांमुळे नाही. तर तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे किंवा मग तिच्या अनोख्या अंदाजामुळे. ती बिनधास्त आहे पण आचरट नाही. त्यामुळे लोकही तिच्या बाबतीत विशेष पसंती दाखवतात. बालिश आणि पोरकट या शब्दांचा आणि तापसीचा तर लांब लांब पर्यंत काही संबंधच नाही. मात्र एखाद्या मुद्द्यावर बोलायचं ठरवलं कि ती त्या मुद्द्याचा फडशा पडल्याशिवाय राहतच नाही. पण आज तापसी यातीळ कोणत्याही विषयामुळे नव्हे तर भारतीय संस्कृतीचे परदेशात नेतृत्व करण्यासाठी चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CQY2fT4p4w9/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर तापसी झळकते आहे. त्याचे कारण तिने परदेशात भारतीय संस्कृतीचे केलेले खंबीर आणि बेधडक नेतृत्व. परदेशातील अनेक लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीचे विशेष आकर्षण असते आणि याचमुळे तापसी अत्यंत झळकताना दिसतेय. त्याचं झालं असं की ती सध्या रशियात आहे. आपले कलाकार किंवा राजकीय मंडळी विदेशात जातात तेव्हा तिथल्या लोकांसारखेच कपडे परिधान करतात. मात्र तापसीने हा ट्रेंड मोडला आणि ती सेंट पिटर्सबर्गच्या रस्त्यांवर अगदी साडीत दिसली.

https://www.instagram.com/p/CQLdOsyJ3ex/?utm_source=ig_web_copy_link

आधी ती रशियात अगोदर मॉस्कोत आणि त्यानंतर आता सेंट पीटर्सबर्ग मध्ये चक्‍क साडीत दिसली. आता यावर त्यात काय विशेष असं म्हणणारे बरेच असतील. मात्र हेच काय ते विशेष आहे. कारण परदेशात भारतीय वेशभूषेत राहणे साधे सोपे गणित नाही आणि तापसीने तेच गणित सोप्पे करून सोडवले आहे. त्यात रशियाबाबत बोलायचे झालेच, तर त्यांना बॉलीवूडबद्दल अत्यंत आकर्षण आहे. तुम्ही तेथील सामान्य नागरिकांना बॉलिवूड कलाकारांबद्दल विचारलं तर ते राज कपूर यांचे नाव सांगतील. त्यामुळे तापसीचा हा वेष तिथल्या लोकांनाही भावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here