कहानी आशिकाना..राझ कातिलाना; तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तापसी पन्नू हि मूळ दाक्षिणात्य अभिनेत्री असली तरीही तिने साऊथ इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंस्त्रीवरही आपल्या अभिनयाची जादू केली आहे. अलीकडच्या काळापासून तापसीचे बॉलिवूड जगतातही एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आता लवकरच तापसी एका नव्या कोऱ्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हसून दिलरुबा नामक एक नवा कोरा आणि वेगळे असे कथानक असणारा चित्रपट घेऊन तापसी पाणि अभिनेता विक्रांत मेस्सी यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. इतकेच नव्हे तर हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेस्सीचा ‘हसीन दिलरुबा’ हा नवाकोरा आगामी चित्रपट येत्या जुलै महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. २ जुलै २०२१ रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अधिकृत हक्क नेटफ्लिक्‍सकडे देण्यात आलेले आहेत. स्वतः तापसी पन्नूने ही माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPpUTP-JyTj/?utm_source=ig_web_copy_link

‘कहाणी आशिकाना, राज कातिलाना.. हसीन दिलरुबा लवकरच नेटफ्लिक्‍सवर.’ असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा चित्रपट काहीतरी गूढ रहस्य घेऊन गोड प्रेमकहाणी उलघडणारा आहे, असा साधारण अंदाज लावता येईल. मात्र या चित्रपटाचे नेमके मूळ काय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

या चित्रपटाचे शूटिंग गेल्यावर्षी जानेवारीत हरिद्वार येथे सुरू झाले होते. आनंद एल. राय या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘हसीन दिलरुबा’च्या बहुतेक सीन्सचे शूटिंग हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये करण्यात आलेले आहे. खरतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता याचे रिलीज पुढे ढकलावे लागले होते.

https://www.instagram.com/p/CPNCuMBFssx/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता विक्रांत मेस्सी याने यापूर्वी ‘छपाक’मध्ये काम केले आहे. तर तापसी पन्नू यापूर्वी ‘सांड की आंख’मध्ये भूमी पेडणेकरसोबत दिसली होती. या दोघींच्याही भूमिकांचे खूप कौतुक झाले होते. विक्रांत मेस्सी आणि तापसी हे दोघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. त्यांची केमिस्ट्री आता पडद्यावरच प्रत्यक्ष बघायला मिळेल. आता उत्सुकतेची बाब हि कि विक्रांत आणि तापसी आपल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना किती भुरळ पाडतात.

Leave a Comment