कौतुकास्पद! अभिनेत्री ट्विंकल खन्नाने पाठविले दिल्ली आणि पंजाबमध्ये ऑक्सिजन कन्संट्रेटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठताना दिसतेय. यामुळे देशात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या संदर्भात बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सुमारे १०० ऑक्सिजन कन्संट्रेटर देण्याबाबत चाहत्यांना वचन दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे तिने सोशल मीडियावर पंजाब आणि दिल्लीत ऑक्सिजन कन्संट्रेटरचा तिसरा लॉट वितरित केल्याचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी तिने दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन कन्संट्रेटरची व्यवस्था यशस्वीरीत्या केली होती. तिने आपल्या ट्विटमध्ये काही संघटनांचे आभार मानले आहेत. ज्यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला आहे.

ट्विंकल खन्नाने ह्या संदर्भातील माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. पंजाब आणि दिल्लीत ऑक्सिजन कन्संट्रेटरचा तिसरा लॉट वितरित केल्याचे तिने फोटो शेअर केले आहेत. तिने ट्विट करताना सांगितले की, आमचा तिसरा लॉट दिल्लीतील रुग्णांना वितरित केला जाणार आहे. तर तिने आणखीन एक फोटो शेअर करत लिहिले की, खालसा एडच्या मदतीने आणखी एक लॉट पंजाबमधील रुग्णांसाठी पाठवला जाणार आहे. तिच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाने याआधी कोरोनाग्रस्तांसाठी २४० ऑक्सिजन कन्संट्रेटरचे वितरण केले होते. याचीही माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. तिने सांगितले होते की, एनजीओच्या मदतीने २५० ऑक्सिजन कन्संट्रेटर उपलब्ध केले आहेत. त्यासोबतच तिने एक फोटोदेखील शेअर केला होता. सोबत म्हटले होते की, मी दैविक फाउंडेशन आणि त्या सर्वांची आभारी आहे, ज्यांनी माझी मदत केली. तिच्या दोन्ही पोस्टवर बऱ्याच लोकांनी तिची प्रशंसा करणाऱ्या समीक्षा दिल्या आहेत. एका युजरने म्हटले कि, तुम्ही खूप छान काम करत आहात. सध्या लोकांना मदतीची गरज आहे. तर अन्य एकाने म्हटले की, आपल्याला एकत्रित येऊन या महारोगराईशी लढावे लागेल.

Leave a Comment