हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adah Sharma) ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेला गायक प्रथमेश लघाटे कायम आपल्या स्वरांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो. लहानपणापासून त्याने आपल्या गोड गळ्याच्या माध्यमातून अनेक बहारदार गीते दिली आहेत. अगदी अभंग, भक्तिगीते यामध्ये प्रथमेश विशेष पारंगत आहे. त्याच्या आवाजातील भक्तीगीत ऐकताना अक्षरशः भक्ती रसात न्हाहल्याचा अनुभव येतो. अशा या लोकप्रिय गायकाच्या सुरांनी सजलेले एक भक्तीगीत बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने गायले आहे.
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. (Adah Sharma) तिने गायलेली बडबडगीते तर नेटकऱ्यांना इतकी आवडतात की हे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. अदा शर्मा मराठी नसूनही ज्या पद्धतीने मराठी बोलते ते पाहून नेटकरी कायम भारावून जातात. अशातच आता अदा शर्माने आपल्या आवाजात चक्क एक भक्तीगीत गायलं आहे. जे मूळ प्रथमेश लघाटेच्या आवाजातील आहे.
अंतरी माझ्या श्रीराम (Adah Sharma)
गायक प्रथमेश लघाटेचे ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे भक्तीगीत २०२१ साली प्रदर्शित झाले होते. या सुंदर भक्तीगीतासाठी प्रथमेशने न केवळ आवाज दिला होता तर अन्य काही जबाबदाऱ्या देखील पेलल्या होत्या. प्रथमेशने या भक्तिगीतासाठी तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन, मिक्सिंग, मास्टरींग, सिनेमॅटोग्राफी, व्हिडीओ ए़डिटिंग अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याचे हेच भक्तीगीत अभिनेत्री अदा शर्माने गायल्यामुळे प्रथमेश अगदी भारावून गेला आहे. त्याने अदाचा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्रथमेश लघाटे भारावला
भारावलेल्या प्रथमेशने अभिनेत्री अदा शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून सोबत या भक्तीगीताच्या मूळ व्हिडीओची लिंक दिली आहे. तसंचही इंस्टाग्राम स्टोरी त्याने अदाला टॅग केली आहे. सोबत फुलाचा इमोजी आणि हात जोडण्याचा इमोजी शेअर केला आहे. (Adah Sharma)
अदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर ४९ लाखांहून जास्त व्ह्यूज आणि ४ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. अदाच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. तर प्रथमेशने गायलेल्या मूळ भक्तीगीताला युट्यूबवर १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि २२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. प्रथमेशच्या आवाजातील हे भक्तीगीत कानाला मंत्रमुग्ध करणारे आहे.