हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आदानी ग्रुपने गेल्या काही वर्षात खूप चांगली प्रगती केलेली आहे. त्यांच्या व्यवसायाची सुसाट गाडी सुटलेली आहे. त्यांच्या वाढत्या व्यवसायामुळे आज आदानी ग्रुपचे मालक गौतम आदानी यांच्या संपत्तीत देखील खूप जास्त वाढ झालेली आहे. त्यांची गणना ही जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये होत आहे. आणि आता त्यांच्या या संपत्तीमध्ये आणखीनच भर पडणार आहे. ती म्हणजे आता आदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट अक्षय ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा पुरवण्याची बोली जिंकलेली आहे. या कंपनीने या प्रकल्पासाठी 4.8 रुपये प्रति युनिट एवढी बोली लावली होती. त्यामुळे हा प्रकल्प आता आदानी समूहाच्या अंडर आलेला आहे.
महाराष्ट्राला काय फायदा होणार ?
हा प्रकल्प अदानी ग्रुपकडे गेल्याने राज्य सरकारला आणि महाराष्ट्रातील नागरिकांना याचा फायदा होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. कारण आता आदानी समूहाने पुढील 25 वर्षासाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्यासाठी ही बोली लावलेली आहे. महाराष्ट्र सध्या विजेसाठी जे पैसे देत आहे. त्याच्यापेक्षा एक रुपया कमी महाराष्ट्रातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे राज्यात भविष्यातील अनेक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. आणि जनतेचे पैसे देखील वाचणार आहे.
वीज पुरवठा कधी सुरू होणार?
हाती आलेल्या माहितीनुसार 48 महिन्यांच्या आत हा वीज पुरवठा सुरू करणार आहे. आदानी ग्रुपने बोली लावल्याप्रमाणे संपूर्ण वीज पुरवठ्याच्या कालावधीत 2.70 रुपये प्रति मिनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे. त्याचप्रमाणे आता कोळशापासून उत्पादन विजेची किंमत ही कोळशाच्या किमतीच्या आधारे असणार आहे . अशाप्रकारे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने मार्चमध्ये सूर्यापासून तयार होणारी 5000 मेगा वॅट आणि पुढच्या वर्षीपासून निर्माण होणारी 1600 वीज खरेदी करण्यासाठी निविदा काढलेली आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी.
हाती आलेल्या माहितीनुसार आदानी ग्रुपने हा प्रकल्प जिंकण्यासाठी प्रतिनिधी 4.8 रुपये एवढी बोली लावली होती. तर दुसरी सर्वात कमी बोली ही जेएसडब्ल्यू एनर्जी यांनी 4.36 रुपये प्रति मिनिट एवढी लावली होती. मागील वर्षी महाराष्ट्रात 4.70 रुपये प्रति युनिट या दराने खरेदी केलेल्या विजेच्या सरासरी किमतीपेक्षाही किंमत कमी आहे. आदानीने लावलेली बोली यापेक्षा 1 रुपये प्रति युनिट कमी आहे. या निविदा प्रक्रिया पुढील 25 वर्षासाठी वीज पुरवठा करण्याचा प्रक्रियेत चार कंपन्यांनी सहभागी घेतला होता.