Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : आजकाल शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आई आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, अदानी ग्रुपच्या जवळपास प्रत्येक शेअर्समध्ये दीर्घकाळापासून प्रचंड वाढ दिसून आली आहे. याद्वारे गुंतवणुकदारांनी भरपूर नफा देखील मिळवला आहे. जर तुम्ही देखील मल्टीबॅगर शेअर्सच्या शोधत असाल तर आजच अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेस यांपैकी कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये करा.

या तिन्ही शेअर्सनी आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज भारतीय शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. हे तिन्ही शेअर्स गॅपअपने उघडले आणि आपला नवीन उच्चांक नोंदवला. Multibagger Stock

Adani Power to seek shareholders nod for related party deal worth Rs 5k  crore with AdaniConnex - Trade Brains

Adani Power

अदानी पॉवर लिमिटेडचे शेअर्स दररोज नवीन उच्चांक बनवत आहे. या शेअर्सने या आठवड्यातील गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या तीन सत्रांमध्ये तो अप्पर सर्किटवर बंद झाला आहे. गेल्या एका महिन्यात तर यामध्ये 40 टक्क्यांहून जास्तीचे वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये याने 250 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे, यावर्षी आतापर्यंत त्याने 310 टक्के इतका मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. अदानी पॉवरने गेल्या एका वर्षात आतापर्यंत 440 टक्के इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे. आज अदानी पॉवरचे शेअर्स 410.65 रुपयांवर बंद झाले. आज त्याने 418.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता. Multibagger Stock

Adani Transmission Limited

Adani Transmission

हे शेअर्स देखील आज गॅपअपने उघडले. यानंतर अवघ्या काही वेळातच 3,694 रुपयांवर पोहोचून त्याने आपला लाइफ-टाइम हाय गाठला. या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. गेल्या या शेअर्सने एका महिन्यात 21 टक्के तर गेल्या 6 महिन्यांत जवळपास 95 टक्के रिटर्न दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यन्त त्याने गुंतवणूकदारांना 110 टक्के नफा दिला आहे. गेल्या एका वर्षात तर तो 1,125 रुपयांवरून 3,694 रुपयांवर आला आहे. यादरम्यान त्याने 225 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Adani Enterprises Profit Slips 99% To Rs 1.8 Crore In December Quarter

Adani Enterprises

गेल्या सलग 6 सत्रांमध्ये या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज हा स्टॉक देखील गॅपअपने उघडला आणि लवकरच त्याने 3,258.90 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. या आठवड्यात या शेअर्सने 12 टक्के तर एका महिन्यात 30 टक्के इतका चांगला नफा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 1,685 रुपयांवरून 3,258 रुपयांवर आले आहेत. टक्केवारीत हा आकडा 90 टक्क्यांहून जास्त आहे. गेल्या एका वर्षात त्याने जवळपास 125 टक्के रिटर्न दिला आहे. यावेळी तो 1,430 रुपयांवरून 3,258 रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanienterprises.com/

हे पण वाचा :

Cotton Rate : कापसाच्या दरात विक्रमी वाढ, MCX वर कापूस 50,000 रुपयांच्या वर !!!

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा

Train Cancelled : जन्माष्टमीच्या दिवशी देखील Railway कडून 157 गाड्या रद्द, अशा प्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा !!!

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!