हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : वाढती महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सध्या दबावाखाली आहे. ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आहे. मात्र असे असूनही काही शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अदानी पॉवरचे शेअर्सही यावर्षी मल्टीबॅगर रिटर्न देत आहे.
2022 मध्ये अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 165 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला NSE वर हे शेअर्स 101 रुपयांवर होते. आता त्यामध्ये वाढ होऊन तो 270 रुपये झाला आहे. या शेअर्सने गेल्या चार वर्षांपासून गुंतवणूकदारांना भरपूर नफा दिला आहे. अदानी ग्रुपच्या या शेअर्स मध्ये गेल्या चार वर्षांत 16 रुपयांवरून 270 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. Multibagger Stock
एका बातमीनुसार जूनमध्ये हे शेअर्स कंसोलिडेशनमध्ये आहेत. हे जाणून घ्या कि, यामुळे गेल्या एका महिन्यात त्यामध्ये 20 टक्क्यांनी घसरण होऊन तो 340 रुपयांवरून 270 रुपयांपर्यंत आला आहे. जर 2022 बाबत बोलायचे झाल्यास आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 165% नफा दिला आहे. त्याच वेळीगेल्या सहा महिन्यांत त्यात 170 टक्के वाढ झाली आहे. Multibagger Stock
गेल्या एका वर्षात तर अदानी पॉवरच्या शेअर्स मध्ये135 टक्क्यांनी मोठी उडी घेतली आहे. या कालावधीत तो 108 रुपयांवरून 270 रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या चार वर्षांचा विचार केला तर या काळात गुंतवणूकदारांना 1600 टक्के नफा मिळाला आहे. हे लक्षात घ्या कि, चार वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 16 रुपये होती. Multibagger Stock
जर एखाद्याने महिनाभरापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचा 20 टक्के तोटा होऊन त्याची गुंतवणूक 80 हजार रुपयांवर आली असेल. जर एखाद्याने या वर्षाच्या सुरुवातीला एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 2.65 लाख रुपये झाली असेल. जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आज 2.70 लाख रुपये मिळतील. Multibagger Stock
जर कोणी वर्षभरापूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज 2.35 लाख रुपये झाले असतील. हे लक्षात घ्या कि, दीर्घ मुदतीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. जर कोणी चार वर्षांपूर्वी अदानी पॉवरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला 17 लाख मिळाले असतील. मंगळवारी अदानी पॉवरची मार्केट कॅप 1.04 लाख कोटी रुपये होती. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanipower.com/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घट, आजचे दर तपासा
New Labour Codes : 1 वर्ष काम करूनही ग्रॅच्युइटी मिळेल का ???
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त रिटर्न !!!
WhatsApp द्वारे Android फोनवरून टायपिंग न करता पाठवा मेसेज !!!