सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकाचे श्रध्दास्थान असलेल्या पाली येथील खंडोबा यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. उद्या दि. 4 ते दि. 6 या तीन दिवसासाठी जादा 148 बसेस सातारा जिल्ह्यातील 11 बस आगारातून सोडण्यात येणार असल्याचे सातारा बस आगाराने सांगितले आहे.
कोरोनानंतर 2 वर्षांनी मोठ्या उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळा पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सातारा व कराड आगारातून 28 बसेस सोडण्यात येणार आहेत. तर कोरेगाव आगारातून 18 बसेस सोडल्या जातील. तर पाटण- 16, फलटण – 12, वाई- 6, दहिवडी-8, महाबळेश्वर- 4, मेढा- 10, पारगाव खंडाळा- 4, वडूज- 14 बसेस सोडण्यात येतील.
खंडोबा देवाच्या यात्रेसाठी पाली येथे येणाऱ्या बसेस या पाली गावच्या कमानीपर्यंत प्रवाश्यांना सोडतील. तर खासगी वाहने ही गावात पोहचणार नाहीत. त्यामुळे एसटी बसमुळे प्रवाश्यांना पालखी सोहळा व मंदिर परिसरात जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.