Adhar Card | राज्य सरकारकडून विविध योजना आणल्या जातात. त्यातीलच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. अनेक महिलांचे दोन हप्ते जमा देखील झालेले आहेत. परंतु अर्ज भरून दोन महिने झाले आहेत. परंतु अजूनही अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक महिलांचे आधार कार्ड (Adhar Card ) हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नसल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अशी माहिती समोर आलेली आहे.
त्यामुळे जर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करणे खूप गरजेचे आहे. तसेच इतर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तरी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे खूप गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.
आपले आधार कार्ड हे आपले एक महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. यावर आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे आपल्या आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक अससेल तर आपल्या ओळखीचा एक मोठा पुरावा सरकारपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे असते. तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्ही अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहता. आणि कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. आता अनेक लोकांना त्यांच्या आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही याची माहिती नसते. परंतु आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून तुमच्या आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे की नाही हे तपासू शकता.
आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही तपासण्याच्या सोप्या स्टेप्स
- सगळ्यात आधी तुम्ही https://uidai. gov.in/ या वेबसाईटवर जायचे आहे त्यावर तुम्ही माय आधार या टॅब वर क्लिक करा.
- त्यानंतर ड्रॉप मेनू वर जा आणि आधार सेवा निवडा.
- यानंतर आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक दिसेल. त्यावर तुम्हाला ओटीपीवरक्लिक करावा लागेल. जिथे तुमच्या नोंदणी कडून मोबाईल क्रमांकवर ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकायचा आहे.
- हा ओटीपी टाकल्यावर तुम्हाला कळेल की तुमच्या आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे. अशाप्रकारे तुम्ही युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया माय आधारच्या अधिकृत पॅटर्नला भेट देऊन तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे की नाही हे तपासू शकता.
बँक खाते लिंक नसल्यास काय करावं?
- आधार कार्ड जर बँकेची लिंक नसेल तर तुम्ही त्या बँकेत जा आणि आधार कार्ड लिंकचा एक फॉर्म भरून द्या
- तुमचा आधार कार्ड आणि पॅन संदर्भात माहिती द्या
- त्यानंतर तुमची केवायसी करा आणि काही मिनिटातच तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केले जाईल.