Adhar Card Update | तुमचे आधारकार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने असेल तर फ्रीमध्ये करा अपडेट; UIDAI ने वाढवली मुदत

Adhar Card Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Adhar Card Update | आपले आधार कार्ड हे आपले एक महत्त्वाचे असे ओळखपत्राचा पुरावा आहे. आजकाल शैक्षणिक किंवा सरकारी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही काम करायचे असेल, तरी आपले आधार कार्ड खूप महत्त्वाचे असते. कारण आपल्या आधार कार्डवर (Adhar Card Update) आपली संपूर्ण माहिती असते. आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन देखील असते. त्यामुळे आपली ओळख पटण्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकवेळा आपण आधार कार्ड काढताना त्याबाबत खूप चुका करत असतो. त्याचप्रमाणे अनेक लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात त्यामुळे आधार कार्डवरील माहिती देखील बदलावी लागते. जसे की पत्ता बदलावा लागतो, अनेक वेळा मोबाईल नंबर देखील बदलावा लागतो. परंतु आता जर तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती चुकली असल्यास तर ती अपडेट करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण UIDAI यांनी आधार कार्ड (Adhar Card Update) धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख देखील वाढवण्यातआलेली आहे. तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत अगदी मोफत तुमचे हेआधार कार्ड अपडेट करू शकता. यामध्ये जर तुमचा फोटो बदलायचा असेल, त्याचप्रमाणे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन बदलायची असेल, तरी देखील तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांच्या आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जास्त जुने झालेले आहे. त्यांनी ती माहिती अपडेट करणे खूप गरजेचे आहे. आधार कार्ड असेल तर त्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. आधार कार्ड अपडेटबाबत मुदत देखील दिली होती. आता ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी देखील द्यावी लागणार नाही.

मुदतवाढ बाबत मोठी घोषणा | Adhar Card Update

UIDAI यांनी आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला मोफत हे आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टलवर जावे लागेल. आणि तिथे जाऊन माहिती अपडेट करावी लागेल. यात तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड द्यावे लागते. आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड द्यावे लागते. आधार अपडेट करण्याची मुदत ही तिसऱ्यांदा वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आधार कार्ड अपडेट करून घ्या.

आधार कार्ड अपडेट कसे करायचे?

  • सगळ्यात आधी तुम्हाला UIDAI यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • ते पेज ओपन झाल्यावर तुम्हाला अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तिथे तुमचा आधार नंबर एंटर करा आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी नंबर तेथे एंटर करा.
  • त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करून अपडेट करावा लागेल.
  • तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल.