Adhar Card Update | लग्नानंतर आधार कार्डवरील माहिती कशी बदलायची? जाणून घ्या सोप्पी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Adhar Card Update | भारतामध्ये आधार कार्ड हा ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. अनेक सरकारी कामांसाठी तसेच खाजगी कामांसाठी देखील आधार कार्ड हे लागते. आधार कार्ड (Adhar Card Update) हे आपले एक सगळ्यात महत्त्वाचे असे ओळख प्रमाणपत्र मानले जाते. ज्याप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड हे ओळखीचे पुरावे आहेत. तसेच आधार कार्ड हे देखील खूप महत्त्वाचा असा पुरावा आहे. आपल्या देशातील जवळपास सगळ्याच लोकांकडे आधार कार्ड (Adhar Card Update)आहे. या आधार कार्डमध्ये आपण वेळोवेळी आपल्याला पाहिजे ते बदल देखील करत असतात. आपले नाव, आडनाव, पत्ता, फोन नंबर बदलू शकतो. आणि महिलांना लग्नानंतर आधार कार्डवरील त्यांची माहिती बदलावी लागते. त्यासाठी काही कागदपत्र सादर करावी लागतात. आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

महिलांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्डवरील पतीचे नाव, आडनाव तसेच पत्ता या सगळ्या गोष्टी बदलतात. परंतु हे कसे करावे? यासाठी काय प्रक्रिया करावी लागते? हे अनेकांना माहित नाही. परंतु आज आपण लग्नानंतर आधार कार्डवरील बदल कसे करायचे? हे अत्यंत सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत

लग्नानंतर किंवा त्याआधी देखील जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता या सगळ्यांमध्ये बदल करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळील आधार कार्ड केंद्रावर जा. आणि तिथे जाऊन तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. या अर्जामध्ये मागितलेली सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आणि आवश्यक ती कागदपत्र जोडावी लागेल. त्यानंतर तुमचा पत्ता अपडेट करण्यात येईल. तसेच तुमच्या पतीचे नाव आडनाव हे देखील बदलले जाईल.

लग्नानंतर जर तुम्हाला नाव आणि आडनावात बदल करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला लग्न पत्रिकेचा पुरावा देखील जोडावा लागेल. तसेच विवाह प्रमाणपत्र पतीच्या आधार कार्डची प्रत, जुने आधार कार्ड, फोटो या सगळ्या गोष्टी जोडव्या लागेल. तसेच आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे देखील गरजेचे असते. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला एक स्लिप मिळेल. त्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर असेल ती स्लिप तुम्हाला नीट ठेवायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला केवळ 50 रुपये एवढा खर्च येईल. या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाल्यावर आधार कार्ड अपडेट झाल्यावर हे आधार कार्ड तुमच्या कथेच्या पत्त्यावर येईल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक घेऊन ऑनलाइन सुद्धा हे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.