रायगड प्रतिनिधी । श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे या कोरोना संकटाच्या काळात वर्क मोड ऑन करून काम करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार म्हणून ओळख असणाऱ्या तटकरे यांनी आज सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळा येथील १०० खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी कोवीड केअर सेंटर येथील किचनची पाहणी केली. तेथील स्वच्छता, सॅनिटायझेशन बाबत व उत्तम दर्जाचा आहार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळा येथील १०० खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला आज भेट दिली.
यावेळी कोवीड केअर सेंटर येथील किचनची पाहणी केली. तेथील स्वच्छता, सॅनिटायझेशन बाबत व उत्तम दर्जाचा आहार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. pic.twitter.com/9etNe1gJ6B— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 15, 2020
यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. डाॅक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अतिरीक्त PPE किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांच्याकरीता राहण्याची सोय करण्यात आली आहे. रूग्णांच्या आरोग्य तपासणी करीता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.
दम्यान, सुधागड तालुक्यात १०० खाटांची व्यवस्था असलेले वावळोली आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर स्थापित करण्यात आले आहे.या कोविड केअर सेंटरला अद्ययावत ठेवावे,अशा सुचना तटकरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. या ठिकाणी दोन ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. कोवीड केअर सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सुचनादेखील संबंधितांना दिल्या. प्रसंगी सुधागड तालुक्याशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला असेही तटकरे यांनी सांगितले.