विधानभवनात पोहचताच आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; बंडखोर शिवसेना आमदारांवर साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान आज आदित्य ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचे मला वाईट वाटते कारण कसाबलाही असे आणले नसेल, अशी टीका ठाकरेंनी केली.

आदित्य ठाकरे हे आपल्या आमदारांसह विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमदारांनी आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका, असे आमचे आवाहन आहे. विधान भवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केले आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे. आज पहिल्यादाच इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कसाबच्याही वेळी इतका बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता कि आज ठरवण्यात आला आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

Vidhansabha Adhiveshan Live | शिंदे-फडणवीस सरकारची आज पहिली अग्निपरीक्षा

 

आजचे विशेष अधिवेशनचे वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार म्हणजे आवाजी पद्धतीने मतदान होईल. गेल्या डिसेंबरमध्ये महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा बदल केला होता. या नव्या बदलानुसारच ही निवडणूक होईल. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचे आहे.

Leave a Comment