हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील शहापूर ताल्लुक्याच्या वाऱ्याचापाडा या गावात खासदार शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी जेवण केले होते. आता त्या झोपडीचा कायापालट होणार असून जिजाऊ सामाजिक शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने त्या झोपडीचे रूपांतर घरकुलात होणार आहे. १५ दिवसांत हे घरकुल बांधले जाणार आहे.
शरद पवार 30 जानेवारीला शहापूर तालुक्यातील वाऱ्याचापाडा येथे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या भूमी पूजनासाठी आले होते. त्यानंतर ते वाऱ्याचापाडा येथील डिजीटल शाळेला भेट देण्यासाठी गेले. वाऱ्याचापाड्याच्या सुरवातीलाच असलेल्या एका झोपडीत शरद पवार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जेवण घेतले. त्या झोपडीतील दांपत्याची शरद पवारांनी चौकशी केली. त्यांना घर बांधून देण्याचा निश्चय केला. शरद पवारांचा हा निश्चय कानी पडताच जिजाऊ सामाजिक शिक्षण संस्थेचे कार्यकर्ते हे घर बांधण्यास सरसावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांधकामासाठी लागणारे साहित्य आणून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. १५ दिवसांत हे घर बांधून होणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.