Saturday, January 28, 2023

औरंगाबादेत 48 धोकादायक इमारतींना प्रशासनाची नोटीस

- Advertisement -

औरंगाबाद | जुन्या असणाऱ्या इमारती पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. पावसाळ्यात इमारती कोसळून अनेक जणांचे प्राण जातात म्हणून महापालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. मुंबईतील मालाड भागातील चार मजली इमारत कोसळून अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद शहरात अशी दुर्घटना टाळावी यासाठी माहिती घेऊनी 48 धोकादायक इमारतीचीं यादी तयार करून नोटीसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

दरवर्षी महापालिकेतर्फे धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. त्यानंतर पुढील वर्षी धोकादायक इमारतींचा विषय समोर येतो. काही ईमारती पावसाळ्यात कोसळतात यातील अनेक ठिकाणी घरमालक व भाडेकरू असा वाद असल्याने या वादातून ईमारती धोकादायक असल्याचे तक्रारी केल्या जातात.

या ठिकाणी सर्वाधिक धोकादायक इमारती

जुन्या शहरातील गुलमंडी, पानदरीबा, दिवानदेवडी, कासारी बाजार, रंगारगल्ली, सिटी चौक, धावणी मोहल्ला, शहागंज, दलालवाडी,पैठणगेट,औरंगपुरा या भागात मोठ्या प्रमाणावर धोकादायक इमारतींची संख्या आहे.