जळगाव : मतदानासाठी प्रशासन सज्ज ; उद्या पार पडणार मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी 

लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय पूर्णपणे सज्ज झाली असून आज निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 34 लाखापेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार असून त्या करिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यात 34 लाख 31 हजार 485 मतदार आहेत. या मतदारांनी लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 14 तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 17 लाख मतदार आहेत. जिल्ह्यात 7992 सर्व्हिस मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या 15287 मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे 7619 मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील 2111 ठिकाणी 3617 मतदान केंद्र आहेत.या मतदान केंद्रांवर 26136 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस करण्यात आली असून जिल्ह्यातील 362 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 36 मतदान केंद्र क्रिटीकल आहे जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी 3532 मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटची प्रात्याक्षिक दाखविण्यात आले होते. यामध्ये 5 लाख 20 हजार 636 मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तर 4 लाख 53 हजार 228 मतदारांनी याचा वापर करुन बघितला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रकाणे 11 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणूका शांततेय व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी एसआरपीचे 3 प्लॅटून, मध्यप्रदेश पोलीसांचे 3 प्लॅटून, रेल्वे पोलीसांचे 1 प्लॅटून तैनात करण्यात येणार आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येकी एक सर्वसाधारण निरिक्षक, एक खर्च निरिक्षक तर एक पोलीस निरिक्षक व 113 स्क्षूम निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Comment