कौतुकास्पद !!! आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भंगारातून साकारली प्रदूषणविरहित गाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विश्रामबाग शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या अर्जुन शिवाजी खरात या विद्यार्थ्याने भंगारातील साहित्यातून चक्क प्रदूषणविरहित चारचाकी ट्रामगाडी बनवली आहे. अर्जुनला लहानपणापासूनच ट्राम गाडीतून फिरण्याची स्वप्न पडायची. लॉकडाउनच्या काळात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होतं. यावेळी अर्जुनने बरेच ग्रीलचे वेस्टेज साहित्य जमवले, त्याचे वेल्डिंग करून सनी मोपेडचे इंजिन, मारुतीचे स्टेरिंग आणि सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली मात्र त्याचा तो पहिला प्रयत्न फसला.

यानंतर काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं असं त्याने आपल्या मनाशी ठरवलं, त्यासाठी त्याने मारुतीचे स्टेरिंग आणले, स्टेरिंग रॅक जोडला, मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकप्सर बसवले, सायकलच्या चाकाऐवजी सनी मोपेडची चाके बसवली, मागच्या बाजूला एक्सेल बार लावले, सेंटरमध्ये चीन वेल बसवले, मोपेडचे ड्रम वेल लावले आणि मग अशा प्रकारे तयार केलेली गाडी चालवून बघितली. मात्र त्याचा तोही प्रयत्न फसला गेला. यामध्ये एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली ती अशी की जर आपण गाडीचं वजन कमी केलं तर …. आणि आशेचा किरण दिसला, गाडी चालायला लागली मग बॉडीच्या कव्हरसाठी पत्रे लावले गेले.

त्यानंतर सहा सात महिने असेच गेले तोपर्यंत इंजिन खराब झाल होतो. यावेळी त्याला कळले की शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे. त्यासाठी मग प्रदूषण विरहित इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी तयार करण्याचं ठरवलं गेलं. त्यानंतर 48 watt ची डीपी मोटार बसवली गेली आणि बारा वॅटच्या 4 बॅटरी बसवल्या बाकीचं सेटिंग डिझाईनही मीच तयार केल्याचं अर्जुनने यावेळी सांगितले. शेवटी ट्राम गाडी तयार झालीच. ही गाडी 48 watt बॅटरीवर पंधरा किलोमीटर चालते. गाडी तयार करताना वेळोवेळी माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिल्याचंही अर्जुनने म्हंटले.

Leave a Comment