कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण उद्योजकाचा पुढाकार; स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये सुरु केले हॉस्पिटल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | पंढरपूर विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता शहर व तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. अशा गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये पंढरपूर येथील तरूण उदायोजक अभिजीत पाटील एका देवदुता सारखे धावून आले आहेत. गरीब व गरजू रूग्णांना माफक दरात उपचार व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःच्या मल्टीप्लेस इमारतीच्या दोन मजल्यावर 50 बेडचे सर्वसोयीनियुक्त कोविड सेंटर सुरू केलं आहे.

अलीकडेच्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. अनेकांना बेड आणि ऑक्सीजन मिळत नसल्याने वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रूग्णांना उपचारा अभावी प्राणास मुकावे लागत आहे. अशा काळात पंढरपुरकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

पंढरपुरातील dvp मल्टिप्लेक्स मधील दोन मजल्यावर कोविड हॉस्पिटलचे हे काम अभिजीत पाटील स्वखर्चाने सुरू केले आहे. या मल्टिप्लेक्स मध्ये ५० बेडचे कोविड हॉस्पिटलसाठी करताना लागणारी सर्व वैद्यकीय उपकरणे औषधे आणि ऑक्सिजन याची तयारी ही केली आहे . पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनाचे ५० बेड यामध्ये तयार होणार असून येत्या दोन दिवसात हे हॉस्पिटल लोकांच्यासाठी सुरू केले जाणार आहे .

श्री. पाटील यांनी हॉस्पिटल सुरु करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ञ वैद्यकीय स्टाफ यांची नेमणूक देखील केली आहे .या हाॅस्पीटलमुळे पंढरपुरातील गोरगरीब नागरिकांना कोरोनावर उपचार घेणे शक्य होणार आहे .  या बरोबरच अभिजीत पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत आणि व्हिडीओकॉन या दोन भक्त निवास मध्ये २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment