धक्कादायक ! पुजाऱ्याने दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कंडारी खुर्द गावात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. नराधम आरोपींनी पीडित मुलीला बाजूच्या एका शेतात फरफटत नेवून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला आहे. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास बदनाम करण्याच्या हेतूनं आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ देखील शूट केला आहे. यानंतर या पीडित मुलीची अवस्था पाहून घडलेला प्रकार गावकऱ्यांना समजला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीना अटक केली आहे.

सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी हि अनाथ असून तिला गावातील एका पुजाऱ्यानं दत्तक घेतलं आहे. घटनेच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पीडित मुलगी एकटी लक्ष्मणनगर तांडा गावाकडे चालत चालली होती. तेव्हा आरोपी सोपान आणि शंभू यांची नजर तिच्यावर पडली. यानंतर आरोपींनी पीडितेचा रस्ता आडवला आणि तिला फरफटत शेजारच्या शेतात नेलं.

याठिकाणी आरोपींनी पीडितेचं तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओसुद्धा शूट केला. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करू अशी धमकी नराधमांनी दिली आहे. पण पीडित अल्पवयीन मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर गावातील लोकांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर गावातील काहींनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

You might also like