Crime News : क्रूरतेचा कळस!! दत्तक घेतलेल्या चिमुकलीचे हातपाय तोडले, आईवडिलचं निघाले हैवान

sillod crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही महिन्यापासून हत्या, बलात्कार, खून मारामाऱ्या सारख्या घटना सर्रास घडत आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर येथून हृदय पिळवळून टाकणारी बातमी समोर येतेय… सिल्लोड तालुक्यात एका ४ वर्षाच्या दत्तक घेतलेल्या चिमुकलीचा स्वतःच्याच आईवडिलांनी खून केला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या अमानुष पद्धतीने चिमुकलीची हत्या करण्यात आले ते पाहून तुमचेही डोके फिरेल. निर्दयी आईवडिलांनी चिमुकलीच्या अंगाला चटके दिले, तिने हात पाय पिरघळून मोडले आणि तिचा खून केला. या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आईबापाला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अजिंठा येथील फौजिया शेख फईम (वय २७ वर्षे) आणि शेख फईम शेख आयुब (वय ३५ वर्षे) याना आधी ४ मुले होती. मात्र मुलगी नसल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी ५ हजार रुपयांमध्ये ४ वर्षीय चिमुकलीला दत्तक घेतल . फौजिया हिला आयातला दत्तक घेणे आवडले नसल्याने तिचा पतीसोबत नेहमी वाद होत होता. आयात फईम शेख असे त्या चिमुकलीचे नाव. … मजुरी करणारे हे कुटुंब १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते. मात्र, या दोघांनी आयत हिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. तिला उपाशी ठेवले. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडले. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत कशाने तरी जोराने मारून तिला गंभीर जखमी केले. चिमुकलीचे अक्षरश: हालहाल केलं. वेदनेने व्याकुळ झालेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी मध्यरात्री ३ वाजता आपले प्राण सोडले.

चिमुकलीचा जीव गेल्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी कोणालाही याचा थांगपत्ता लागू नये, यासाठी परस्पर तिचे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मध्यरात्रीच तिचा सिल्लोड येथील एका कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दफनविधी रोखला. तसेच या निर्दयी आई वडिलांना बेड्या ठोकल्या. मात्र या संपूर्ण घटनेने सिल्लोड मध्ये खळबळ उडाली आहे… एखादा मातापिता इतका निर्दयी कसा असू शकतो असा प्रश्न आता पडलाय.