धक्कादायक ! डोंगरात नेऊन अल्पवयीन मुलीवर मित्रानेच केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतील व्यक्ती हि पीडित मुलीचा मित्र आहे. आरोपी मित्राने आपल्या मैत्रिणीला गप्पा मारण्याच्या बहाण्याने खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून नेले होते. याठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीसांनी आरोपीवर बलात्कार, अपहरण आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी मित्राचे नाव सोमेश भिकुलाल मुंगसे असून तो तिसगाव येथील रहिवासी आहे. आरोपीची काही दिवसांपूर्वी पीडित मुलीसोबत मैत्री झाली होती. त्याने पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर, 4 जून रोजी त्याने तिला गप्पा मारण्याचा बहाणा करत दुचाकीवरून खवड्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. या ठिकाणी आरोपीने संधीचा फायदा उचलत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान आपली मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीला स्वतःच्या घरी नेले. पीडित मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले असल्यामुळे तिला आजची रात्र आपल्या घरात राहु द्यावं, अशी विनंती आरोपीने आपल्या आई वडिलांना केली होती.

त्यामुळे आरोपीच्या पालकांनीही पीडितेला आपल्या घरात एका रात्रीसाठी आसरा दिला. दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला सिडको येथील एका उद्यानासमोर सोडले आणि तिकडून फरार झाला. पीडित तरुणी खूप घाबरल्याने याची माहिती स्थानिक नागरिकांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सायंकाळी 6 तरुणीला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली.यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी 6 जून रोजी रात्री उशीरा आरोपी तरुणाला औद्योगिक परिसरातून अटक केली. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment