देशातील ‘या’ शहरांमध्ये केली जात आहे भेसळयुक्त आणि बनावट वस्तूंची विक्री, त्याविषयी जाणून घ्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खाद्य तेल (Cooking Oil) कुठल्याहीसर्वोत्तम ब्रँडचे असू द्यात, परंतु देशातील काही शहरांमध्ये तेलाने बनवलेल्या वस्तू खाऊ नका. बनावट आणि डुप्लिकेट तेले बनविणार्‍या माफियांनी कोणत्याही ब्रँडच्या तेलाला सोडलेले नाही. बनावट आणि डुप्लिकेट तेल मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहे आणि ते बनवल्यानंतर बाजारात अंदाधुंद पद्धतीने विकले जात आहे. या प्रकारच्या तेलाचे सर्वाधिक ग्राहक बाजारात खाद्यपदार्थांची विक्री करणारे आहेत. अशा माफियांनी बिस्किटे आणि चॉकलेटना सुद्धा सोडलेले नाही. सरकारी संस्था आता याचा देखील तपास करत आहेत. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करून कोट्यावधी रुपये आकारले जात आहेत. सरकारी अहवालात किती कारवाई केली गेली आणि किती दंड केला आहे यावरून हे दिसते की देशात अशी काही राज्ये आहेत जिथे या व्यवसायात सर्वाधिक वाढ होते आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच संसदेत एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार खाद्यतेल, चॉकलेट-बिस्किटे आणि डब्बा बंद केलेले इतर बनावट व डुप्लिकेट पदार्थ बनविण्यात येत आहेत. सरकारी एजन्सींच्या तपासणीत ते गुणवत्तेच्या निकषांवरही अपयशी ठरत आहेत. यामुळेच अशा लोकांवर कारवाई करतांना त्यांना शिक्षाही दिली जात असून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचा दंडही आकारला जात आहे.

कोणत्या राज्यात किती दंड आकारला गेला
बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते किंवा डुप्लिकेट बनवून विकले जात आहेत, अशी माहिती भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) या सरकारी संस्थेने दिली आहे. हीच एजन्सी जेव्हा एखादे प्रकरण पकडते तेव्हा त्याला न्यायालयात नेते. मंत्रालयाच्या अहवालानुसार अशी काही राज्ये आहेत जिथे गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक दंड आकारण्यात आला आहे.

>> 2017-18- नुसार

एकूण दंडाची रक्कम – 26.35 कोटी.

यूपीमध्ये 12.92, दिल्ली 2.69 कोटी, गुजरात 2.60, मध्य प्रदेश 2.39 आणि तामिळनाडू 2.24 कोटी दंड आकारला गेला. तर पंजाब 46 लाख, जम्मू-काश्मीर 55 लाख आणि हरियाणात 31 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

>> 2018-19- नुसार

एकूण दंडाची रक्कम – 32.58 कोटी.

यूपीमध्ये 16 कोटी, गुजरात 1.96, मध्य प्रदेश 1.82, महाराष्ट्र 1.19 कोटी, पंजाब 1.57 कोटी आणि तामिळनाडू 5 कोटी रुपये वसूल केले. त्याचवेळी जम्मू-काश्मीर 55 लाख, दिल्ली 47 लाख आणि हरियाणात 51 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

>> 2019-20 नुसार

एकूण दंडाची रक्कम – 1.61 कोटी.

दिल्ली 32.50 लाख, मध्य प्रदेश 11.34 लाख, तामिळनाडू 74 लाख आणि यूपी 19 लाख रुपये लागू केले.

याबाबत अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणतात, “भेसळ आणि डुप्लिकेट तेल विकल्या जात असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. आम्ही नुकतीच अशीच एक तेल तयार करणारी टोळी पकडली आणि ती मुंबई गुन्हे शाखेकडे दिली. आम्ही असोसिएशनच्या स्तरावर देखील खूप सतर्क आहोत. माहिती मिळताच ते प्रशासनाच्या अधिकार्‍यांनाही सांगतात. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.