विवाहबाह्य संबंध हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा एतिहासिक निकाल

Adultery
Adultery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीटाने आज निकाल दिला. व्यभिचार गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिटाने निकालात म्हटले आहे. मात्र व्यभिचार घटस्फोटास कारण होऊ शकतो असेही म्हटले आहे. ‘महिला आणि पुरूष काद्याद्याच्या दृष्टीने समान असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने कलम 497 अवैध ठरवून एेतिहासिक निर्णय दिला आहे.

इतर महत्वाचे –

या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे

तुमचं हे असं होतंय का? बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल आकर्षण वाटतंय का?

व्यभिचार कायदा हा नेहमीच वादातीत राहिला आहे. या कायद्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना न्याय देण्यात भेदभाव करण्यात येत असल्याची अनेकांमध्ये भावना आहे. व्यभिचारमुळे लग्नात तणाव निर्माण होतो. त्यामुळे या व्यभिचाराच्या आधारावर दाम्पत्याला घटस्फोट मिळू शकतो, पण हा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही’, असं सर्वोच्च न्यायालायनं स्पष्ट केलंय. शिवाय पती हा पत्नीचा मालक नाही, महिलांचा सन्मान आपण राखलाच पाहिजे असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीटाने आज यावर निर्णय दिला. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचा समावेश होता. ‘व्यभिचार घटस्फोटासाठी कारण ठरु शकतो परंतू त्याला गुन्हा म्हणता येणार नाही’ असे या घंडपिटाने म्हटले आहे.

इतर महत्वाचे –

जाणुन घ्या कोणत्या गोष्टींमुळे तुमची रिलेशनशिप येऊ शकते धोक्यात

 

केरळचे जोसेफ साइन यांनी या संदर्भात याचिका दाखल करत कलम 497 ला आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याचिका दाखल करून घेतली होती आणि जानेवारीमध्ये ती घटनापीठाकडे पाठवण्यात आली होती. त्याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिटाने निर्णय दिला.

काय आहे व्यभिचार कायदा?

दिडशे वर्षं जुन्या कलम 497 कलमांतर्गत विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पतीस काहीसं मोकळे रान मिळतं. एखाद्या विवाहित पुरुषानं इतर विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु त्यासाठी त्या विवाहित महिलेच्या पतीनं त्या परपुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज असते. तसेच पतीच्या इतर कुटुंबीयांनी अशा विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पुरुषाविरोधात कोणतीही तक्रार करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यावरच आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.