इनकम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय ; जलद रिफंड मिळवण्यासाठी प्रगत IEC 3.0 प्रणाली सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोक इनकम टॅक्स भरताना दिसतात .त्यांना टॅक्स भरल्यानंतर रिफंडच्या बाबतील अनेक अडचणी येतात . त्याचीच दखल घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ई-फायलिंग पोर्टलमध्ये मोठा बदल होणार असल्याचे सांगितले आहे. टॅक्स विभाग लवकरच नवीन IEC 3.0 प्रणाली सुरु करणार आहे. आधीचे IEC 2.0 ( इंटिग्रेटेड ई-फायलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर ) याचा कार्यकाळ संपत असून आधीच्या IEC 2.0 ची जागा आता IEC 3.0 घेणार आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर होऊन , जलद रिफंड मिळण्यास सोपे जाईल .

प्रगत ई-फायलिंग सुरु

IEC हे प्रगत ई-फायलिंग प्लॅटफॉर्म सुरु केला असून , त्यामध्ये करदात्यांना आपला आयटीआर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरता येतो. यामध्ये नियमित फॉर्म जमा करण्याची सुविधा आहे . त्याचसोबत तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता. याचा महत्वाचा भाग म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) हा असून , याच्या माध्यमातून ई-फायलिंग पोर्टल आणि इंटिग्रेटेड टॅक्सपेयर डेटा बेसवरून भरलेल्या रिटर्न्सवर प्रक्रिया करते. त्यासोबतच आयईसी प्रकल्प क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी बॅक ऑफिस पोर्टल देखील समाविष्ट आहे , ज्यातून अधिकारी करदात्यांच्या फाइलिंग आणि प्रोसेसिंग डेटामध्ये प्रवेश करू शकतात.

जलद रिफंड मिळण्यास मदत

नवीन IEC 3.0 चा मुख्य उद्देश अधिक प्रगत आणि चांगले व्यवस्थापन उभारण्याचे आहे . या आयटीआर प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गती दिली जाईल, ज्यामुळे करदात्यांना जलद रिफंड मिळण्यास मदत होईल. या नवीन प्रणालीच्या वापरामुळे आधीच्या प्रणालीतील त्रुटी कमी होतील .ज्यामुळे करदात्याला जास्त चांगल्या अनुभव प्राप्त होईल.