हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी तसेच जेवण ठेवतात. कारण तांबे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असे खनिज म्हणून काम करतो. आणि यामुळे आपल्या हाडांची ताकद देखील वाढते. आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. हृदयासाठी देखील तांब्याचा चांगला फायदा होतो. तांब्याचे आपल्या शरीराला फायदा व्हावे, त्यामुळे अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवायचे तसेच तांब्याच्या भांड्यांचा वापर देखील करायचे. आणि यामुळेच आजकाल तांब्याची बॉटल तसेच तांब्याचा पिंप यांच्यामधून पाणी पिण्याची फॅशन आली आहे. परंतु अनेक लोकांना या तांब्याच्या बाटलीतून पाणी पिण्याचे तोटे माहित नाही. त्यामुळे तुम्हाला या तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि काय होते होतात ते जाणून घेणे गरजेचे आहे.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिले तर तुमचे पोट स्वच्छ होते. तसेच तुमच्या त्वचेला देखील एक उजाळा प्राप्त होतो. तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवल्याने हानिकारक जंतूची वाढ होत नाही. आणि चांगले पाणी आपल्या पोटात जाते. परंतु जर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, तर त्याचा फायदा होण्याऐवजी आपले नुकसान होते. तुमच्या शरीराला तर रोज दहा मिलीग्राम तांब्याची आवश्यकता असते. परंतु त्यापेक्षा कमी तांबे आपल्या शरीराला मिळाले तर आपला मेंदू व्यवस्थित काम करणार नाही. यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवतात. जेणेकरून तांब्याचा अंश त्यामध्ये उतरायला सुरुवात होत. आणि तुमच्या शरीरासाठी याचा फायदा होतो.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे तोटे
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर आहे. परंतु तुम्ही केलेली एक चूक तुमच्या शुद्ध पाण्याला विषारी देखील बनवू शकतो. अनेक वेळा आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो. त्यावेळी तांब्याचा अर्क त्यामध्ये उतरतो. तो जर योग्य प्रमाणात असेल तर ठीक. परंतु तांब्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर ते मात्र तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तांब्याचे प्रमाण जर जास्त असेल, तर ते आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये साचून राहते. आणि त्यानंतर ते आपल्या शरीरासाठी विषारी देखील ठरते.