Afghan-Taliban : अफगाण सुरक्षा दलांनी तालिबानच्या गव्हर्नरसह 25 सैनिकांना केले ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । अफगाणिस्तानच्या कुंडुज आणि निमरुझ प्रांतात, सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन्ही प्रांतांच्या तालिबान गव्हर्नरसहित 25 सैनिक मारले गेले. संरक्षण मंत्रालयाचे उप प्रवक्ते फवाद अमान यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री कुंदुज प्रांताच्या दश्त अचीर जिल्ह्यात अफगाणिस्तान राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दल आणि सार्वजनिक बंडखोर दलाच्या सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत प्रांताचे तालिबानच्या गव्हर्नरसहित अकरा सैनिक मारले गेले.

ते म्हणाले की,”तालिबानचे गव्हर्नर अब्दुल खालिकसह 14 लढाऊ निमरुज प्रांतातील झरंज शहरात तालिबानांच्या सभेवर झालेल्या हवाई दलाच्या हल्ल्यात ठार झाले. याशिवाय, बदाखशान प्रांताची राजधानी फैजाबाद आणि तखार प्रांताची राजधानी टेबलानवर तालिबान्यांनी केलेले हल्ले काल रात्री सुरक्षा दलांनी उधळून लावले. शहरांच्या बाहेरील भागात सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हजारो सैनिक मारले गेले आणि जखमी झाले.

उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून विदेशी सैन्याच्या माघारीची सुरुवात मे महिन्यात झाली तेव्हापासून तालिबानकडून हिंसाचार वाढत असल्याचे दिसून आले आहे. तालिबानचा हिंसाचार थांबवण्यासाठी अफगाण लष्करानेही तयारी केली आहे. जवळजवळ दररोज हवाई आणि जमीनी कारवाईद्वारे तालिबानी सैन्याला संपवत आहे.

Leave a Comment