तालिबानचे मोठे विधान; म्हणाले,” भारत-पाकिस्तान सीमेवर लढा, आम्हाला यापासून दूर ठेवा”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल । तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत व्यवहारात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असे स्टेनिकझाई म्हणाले. काबूलमधील तालिबान सरकारच्या अंतर्गत स्टॅनिकझाई परराष्ट्र व्यवहार हाताळत असल्याचे मानले जाते. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, स्टानिकझाई म्हणाले की,” तालिबानला त्याच्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत.”

तालिबान सरकारला भारताबद्दल पूर्ववैमनस्यपूर्ण शत्रुत्व असण्याची किंवा पाकिस्तानच्या संगनमताने भारताला लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, स्टानिकझाई म्हणाले की,”माध्यमांमध्ये येणाऱ्या काही बातम्या चुकीच्या आहेत.” ते म्हणाले,”आम्ही असे विधान कधीच केले नाही , किंवा आमच्या बाजूने असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. आम्हाला आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत.”

तालिबानच्या नेत्याने सांगितले की,”भारत आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या भौगोलिक आणि राजकीय वादाची त्यांना जाणीव आहे, परंतु तालिबानला आशा आहे की, अफगाणिस्तानचा वापर दोन्ही देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये होणार नाही.” स्टनिकझाई पुढे म्हणाले कि,” त्यांच्यामध्ये एक लांब सीमा आहे. दोन्ही देश त्यांच्या सीमेवर लढू शकतात. मात्र, त्यांनी यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये आणि आम्ही कोणत्याही देशाला यासाठी आपली जमीन वापरू देणार नाही.”

तत्पूर्वी, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले होते की,” तालिबानला अफगाणिस्तानमधील भारताच्या विकास प्रकल्पाबाबत कधीच तक्रार नव्हती, पण तालिबानने भारताचा विरोध केला कारण नवी दिल्लीने काबूलच्या अशरफ घनी सरकारला पाठिंबा दिला.”

अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांत भारताने केलेल्या विकासकामांवर – रस्त्यांपासून धरणे आणि अगदी संसदेच्या इमारतीपर्यंत – आणि तालिबान द्विपक्षीय व्यापार थांबवतील अशी भीती आहे. त्याबाबत शाहीन म्हणाले की,”अफगाण लोकांच्या हिताशी संबंधित प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत जर ते बांधकाम अद्याप अपूर्ण असेल तर ते पूर्ण केले पाहिजेत.”

Leave a Comment