अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानात मॅटरनिटी हॉस्पिटलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १३ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला आणि मुलेही ठार झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात येते आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या महिला आणि लहान मुलांवरही यावेळी हल्ले झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन नवजात मुलेही ठार झाली आहेत.

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत टीका केली आहे. हमीद करझाई यांनी ट्विटद्वारे आपला संदेश दिला आहे. त्यांनी लिहिले आहे – काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर झालेल्या बॉम्बस्फोटाची मी जोरदार टीका करतो, ज्यामध्ये नवजात, इतर मुले आणि महिलाही ठार झाल्या आहेत. हा हिंसाचार हे आपल्या देशाबद्दल आणि आपल्या लोकांविरूद्ध केलेल्या परदेशी कट रचण्याचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

 

काबूलमधील प्रसूती रुग्णालयावर आज दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला तसेच हॅन्ड ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच या हल्ल्यात बरेच लोक जखमीही झाले आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ठार झालेल्यांमध्ये सुरक्षा कर्मचारीही आहेत. या दहशतवादी हल्ल्यात अनेक डॉक्टर अडकल्याची माहितीही मिळाली आहे. रुग्णालयाच्या आतून अजूनही गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत.

काबूलच्या दष्ट परिसरातील रुग्णालयावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे १४० लोक अजूनही आतमध्ये अडकले आहेत. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने माहिती दिली आहे की सुमारे ३ हल्लेखोरांनी हा हल्ला केला आहे. एक हल्लेखोर ठार झाल्याची माहिती मिळाली आहे, तर उर्वरित दोघं बरोबर चकमकी चालू आहे.

या रुग्णालयात मोठ्या संख्येने परदेशी लोकही काम करतात. असे म्हटले जात आहे की हल्लेखोरांचे लक्ष्य हे परदेशी नागरिकच आहेत. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने हे रुग्णालय जवळपास रिकामे केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment