मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाही. ज्याप्रमाणे आपल्या जन्म झाला त्यानुसार कधी ना कधी आपला मृत्यू होणार हे ठरलेलेच असते. परंतु मृत्यूनंतर नक्की काय होते? माणसाचा देह राहून नक्की शरीरातील आत्मा कुठे जातो? हे एक रहस्य आहे. मृत्यूनंतरचे जग कसे असते? माणूस कुठे जातो? हे कोणालाच माहीत नाही. परंतु काही लोक असे आहे ज्यांनी दावा केलेला आहे की, त्यांनी मृत्यूनंतरचे जग पाहिलेले आहे. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे स्कॉट ड्रमंड. स्कॉटने असे सांगितले की, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले होते. परंतु 20 मिनिटानंतर तो पुन्हा जिवंत झाला. या वीस मिनिटात त्यांनी मृत्यूनंतरचे संपूर्ण आयुष्य अनुभवले आहे त्याचबद्दल त्याने सांगितले.
माध्यमातील मधील वृत्तानुसार स्कॉटचे वय आता 60 वर्ष आहे. त्यावेळी त्याने सांगितले की, जेव्हा तो 28 वर्षाचा होता तेव्हा अपघातात त्याचाअंगठा कापला गेला. होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अंगठ्याचे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावेळी त्या ऑपरेशन थेटरमधील एका नर्सने यापूर्वी कधीही सर्जिकल टॉर्निकेट वापरले नव्हते. हे उपकरण वापरून रक्तप्रवाह थांबवण्यासाठी अवयवांवर दाब दिला जातो. परंतु त्या नर्सने आधी कधीच वापरले नसल्यामुळे तिने ते चूक केली आणि काही सेकंदातच स्कॉटचा मृत्यू झाला.
त्यापुढे स्कॉट म्हणाला की, ती नर्सओरडत बाहेर गेली आणि म्हणाली की, मी याला मारले आहे. त्यानंतर ती खोलीतून ती बाहेर गेली. त्यानंतर स्कॉटच्या शरीरातील विचित्र खळबळ झाली आणि ती खळबळ त्याच्या हृदयापर्यंत पोहोचवली . अचानक त्याला जाणवले की त्याचे तो त्याच्या शरीरापासून हवेत तरंगत आहे. म्हणजेच त्यावेळी त्याच्या शरीरातून त्याचा आत्मा निघून जात होता. त्याने सांगितले की, त्याच्या शेजारी कुणीतरी उभे आहे ज्याला तो देव मानत आहे.
त्यांनी सांगितले की, त्या व्यक्तीला चेहरा दिसत नव्हता त्यांनी स्कॉटला एका फुलांनी भरलेल्या सुंदर शेतात नेले. तो त्या व्यक्तीशी तोंडाने न बोलता मनाने बोलत होता. त्या व्यक्तीने स्कॉटला परत कधीही मागे वळून न बघण्याच्या सूचना दिल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यक्ती त्याच्या शेजारी उभा होता तसेच चालत होता तरी देखील त्याला दिसत नव्हता.
स्पॉटने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर तो सुंदर फुलांच्या शेतात पोहोचला. तिथे सुंदर जंगली फुले होती. जी त्याच्या कमरेपर्यंत उंच होती. अनेक उंच उंच झाडे होती जी खूप विचित्र दिसत होती. ती झाडे पृथ्वीवर दिसणाऱ्या झाडांसारखी नव्हती. परंतु काही वेळाने त्याच्यासोबत असणारी व्यक्ती त्याला दिसली नाही. तो ढगांकडे गेला ढगांच्या आतून एक हात बाहेर आला. त्यावेळी त्याला आवाज आला की, तुझी वेळ अजून आली नाही तुला अजून बरेच काही करायचे आहे. मग तो हात पुन्हा ढगांकडे गेला. आणि हॉस्पिटलमध्ये पडलेल्या स्कॉटच्या शरीरात पुन्हा त्याचा जीव आला. तो जिवंत झाला असे वर्णन स्कॉटने केलेले आहे.