Monday, January 30, 2023

२० वर्षांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मुलांना शोधण्यासाठी ‘या’ कासवाने केला ३७ हजार किमी प्रवास

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कासव हा समुद्रात राहणारा एक भव्य प्राणी आहे. जलचरांमध्ये शांत प्राणी असणार्‍या कासवाच्या शिकारींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाढ झाली आहे. याच कासवांच्या संवर्धनाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २३ मे रोजी जागतिक टर्टल डे

साजरा केला जातो. या दिवसाची थीमही दरवर्षी वेगळी असते. सर्वसाधारणपणे या दिवशी प्राणीप्रेमी हे हिरवे कपडे घालतात. जागतिक टर्टल डे पहिल्यांदा २००० साली साजरा करण्यात आला, तेव्हापासून तो आजपर्यंत चालूच आहे. अलीकडेच एका कासवाने समुद्रात सुमारे ३७ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे, ज्याच्या या प्रवासाची कथा लोकांना प्रेरणा देणारी आहे.

- Advertisement -

IFS ने शेअर केली या कासवाची कथा
जागतिक टर्टल डेच्या दिवशी भारतीय वनसेवेचे अधिकारी प्रवीण कसवान यांनी एका कासवाची एक हटके गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की,” कासवाचा त्याच्या घरापर्यंतचा अप्रतिम प्रवास. त्यांनी सांगितले की,’ योशी नावाच्या एका कासवाने मार्चमध्ये आपल्या पिल्लाना जन्म देण्यासाठी आणि त्यांना वाढवण्यासाठी सुमारे ३७ हजार किलोमीटरचा प्रवास करून योग्य असे स्थान शोधले. त्याचा हा प्रवास आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया असा होता. ते म्हणाले की,”हे प्राणी इतका लांब प्रवास कसा आणि का करतात हे आपल्याला पाहण्याची गरज आहे.”

 

योशीवर सेटेलाइट टॅग लावण्यात आला
एका अहवालानुसार, योशी नावाची ही मादी कासव जखमी अवस्थेत आढळली होती. ज्यानंतर प्राणी प्रेमींनी ती बरे होईपर्यंत तिच्यावर उपचार केले आणि तिचे परीक्षण केले. दरम्यान, तिच्या शरीरावर एक सेटेलाइट टॅग लावण्यात आला होता, जेणेकरून त्यांच्या प्रजातींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. अखेर २० वर्षांनंतर तिची सुटका झाली. त्यानंतर तिने आपल्यासाठी घराचा शोध सुरू केला. यासाठी योशी या कासवाने जवळपास अर्ध्या जगाचा प्रवास केला. तिच्या या ३७ हजार किलोमीटरच्या प्रवासाची कथा ऐकून माणसे थबकून गेली.

 

 

लॉकडाऊनमध्ये कासवांना मिळातोय आराम
दुसरीकडे, भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. देशात सध्या राबविलेल्या लॉकडाऊनमुळे लोक त्यांच्या घरातच कैद झाले आहेत, तर उद्योगही बंद आहेत. याचा थेट परिणाम वातावरणावर आणि प्राण्यांवर स्पष्टपणे झालेला दिसत आहे. समुद्र किनारी माणसांची वर्दळ कमी झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर समुद्री कासवं ही किनाऱ्याकडे वळत आहेत. अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर समुद्री कासवांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये कासवाची पिल्ले बीचवर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून हे अनुमान काढले जाऊ शकते की या कासवांच्या पिल्लांचा नुकताच जन्म झाला आहे. ज्यामुळे त्यांना व्यवस्थित चालणेही शक्य होत नाहीये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.