5 दिवसांनी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम नाहीतर हप्ता अडकेल

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. आजपासून अगदी 5 दिवसांनी म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करतील. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण 4000 रुपये जमा होतील.

या शेतकऱ्यांना मिळणार आहेत 4000 रुपये
ज्या शेतकर्‍यांना अद्याप 9 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे.

e-KYC शिवाय पैसे मिळणार नाहीत
पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी e-KYC पूर्ण केल्यावरच त्यांना 10 वा हप्ता मिळेल. सरकारने या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही e-KYC न केल्यास तुमचा 10 वा हप्ता अडकू शकतो.

पैसे मिळतील की नाही ते पहा
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
1. सर्वप्रथम तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल.
3. Farmers Corner सेगमेंटमध्ये तुम्हाला Beneficiaries List पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
5. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर सम्पूर्ण Beneficiaries List दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

हेल्पलाइन नंबरवर कॉन्टॅक्ट करा
तुमचे सर्व डिटेल्स बरोबर असतील आणि त्यानंतरही तुमचे नाव लिस्टमध्ये समाविष्ट नसेल, तर तुम्ही हेल्पलाइन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचे नाव जोडू शकता. यासाठी 155261 किंवा 011-24300606 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. इथे तुमची अडचण दूर होईल.

अधिकृत वेबसाइटवरही तक्रार नोंदवता येईल
याशिवाय तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्याशीही कॉन्टॅक्ट करता येईल. येथे तुम्ही तुमची समस्या सांगू शकता आणि सोडवू शकता. याशिवाय तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकता.

You might also like