अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारला कोरोना झाल्यानंतर आता त्यापाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. सध्या त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 5 एप्रिलला शंभर जण ‘राम सेतु’च्या सेटवर आज कामाला सुरुवात करणार होते. मडमधील सेटवर हे सर्व ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगच्या कामाला सुरुवात करणार होते. मात्र अक्षय कुमारला करोनाची लागण झाल्याने या सिनेमाचा भाग बनणाऱ्यांसाठी करोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यात 100 जणांपैकी 45 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

अक्षय कुमारसोबत 45 ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. जवळपास 13 ते 14 दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like