अरे देवा! कोरोना, बर्ड फ्लूनंतर आता देशात आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप

नवी दिल्ली । देशात कोरोनाचे संकट असतानाच बर्ड फ्लूचं संकट आलं आहे. देशभरात शेकडो पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचं संकट असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

या रहस्यमयी आजारामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली असून प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये या नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोमीरपल्ली गावात गेल्या 45 दिवसांत तब्बल 700 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. तापासोबतच या गावामध्ये रहस्यमयी आजारीचं सारखीच लक्षणं ही 22 लोकांमध्ये आढळून आली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रहस्यमयी आजार असलेल्या लोकांनी एलरू येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री अल्ला काली कृष्णा यांनी गावाचा दौरा केला आणि लोकांची विचारपूस केली. एकंदरीत परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेतलं. गावामध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच डॉक्टरांच्या अनेक टीम्स या गावागावात जाणून लोकांची तपासणी करत आहेत. तसेच या आजाराचा नेमका शोध घेण्यासाठी नमुने जमा करण्यात आले असून त्याची तपासणी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like