बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंगळवारी पार पडला राजाचा दशक्रिया विधी

जुन्नर प्रतिनिधी | सतीश शिंदे

माणूस माणसाचा दशक्रिया करतो ऐकलं असेल परंतु माणसाची जिवाभावाचा कौटुंबिक सदस्य असणारा राजा (बैल) अकस्मात गेला आणि संपूर्ण कुटुंब हेलावून गेलं. त्याचा दशक्रिया विधी आणि शोकसभा ठेवण्यात आली. राजा च्या आठवणींनी कुटुंबीय आणि गावातील ग्रामस्थ भावनिक होऊन आठ्वणींना उजाळा देत होते.

राजा तसा प्रचंड कष्टाळू, या यंत्रयुगातही आपल्यावरील मालकाचं प्रेम कमी होऊ नये म्हणून मालकाला लागेल ती सगळीच मदत करायचा..मालकाचे ४ पैसे वाचवून मालकाला समाधान मिळाल्याच्या आनंदात तोही खुश राहायचा.. पण येणाऱ्या प्रत्येकाला कधीतरी हे जग सोडून जावं लागतं तसं ते त्यालाही लागू पडलं..ही गोष्ट आहे जुन्नरच्या वैष्णवधाम येथील गायकवाड व केदार कुटुंबामध्ये वाढलेल्या राजा नावाच्या बैलाची, काळदेववाडी, चिंचेचीवाडी या गावांशी घनिष्ठपणे जोडला गेलेला राजा दहा तारखेला मरण पावला.

त्याचा अंत्यविधी शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर मंगळवारी राजाचा दशक्रिया विधी गावामध्ये ठेवला होता. यादरम्यान शोकसभादेखील आयोजित केली होती. त्यानंतर गावातील लोकांना जेवणदेखील देण्यात आलं. खर म्हणजे माणूस मरण पावल्यानंतर जसं दुःख होत तसंच दुःख गायकवाड व केदार कुटुंबियांना राजाच्या जाण्यानंतर झालं. त्याच्या आठवणीटच हा दशक्रिया विधी घेण्यात आला.