भाजप नेत्यांपाठोपाठ शरद पवारही दिल्लीत; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील देखील यापूर्वीच दिल्लीत पोचल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करुन अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची खलबते सुरु आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या दोन्ही नेते भेटी घेणार आहेत. त्यांनी भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.