आता महामार्गावर अपघात झाल्यास आपल्याला त्वरित उपचार मिळणार, सरकारने बनविली ‘ही’ योजना, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अनेक प्रयत्न करूनही देशात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या कमी होत नाही. यासह, रस्ते अपघातात पीडिताला मदत करण्याची इचछा असूनही अनेक लोकं ती करण्यापासून परावृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच महामार्गावरील (Highway) अपघातासाठी विशेष रस्ते सुरक्षा यंत्रणा (Road safety system) बनवणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्वरित उपचारासाठी त्याच्यापर्यंत शासकीय मदत पोहोचेल. चला तर मग सरकारच्या या रस्ता सुरक्षा यंत्रणेबद्दल जाणून घेऊया …

Road safety system कशी असेल ?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या रस्ता सुरक्षा यंत्रणेत एखाद्याला महामार्गावर अपघात झाल्यास त्यामुळे पोलिस आणि रुग्णवाहिका सेवांना (Ambulance services) याची माहिती तातडीने मिळणार आहे. यासह या प्रणालीतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, घटनास्थळी येणारी रुग्णवाहिका ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) ने सुसज्ज असेल. जेणेकरून जखमींना लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात (Hospital) नेले जाऊ शकेल.

या यंत्रणेत पोलिस, रुग्णवाहिका आणि रुग्णालय जोडले जातील
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सचिव गीधर अरमाने यांच्या म्हणण्यानुसार, या प्रणालीमध्ये पोलिस, रुग्णवाहिका आणि रुग्णालय एकाच नेटवर्कद्वारे जोडले जातील. जेणेकरून अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित उपचार मिळू शकतील. त्याचबरोबर ते म्हणाले की,” रस्ता सुरक्षा यंत्रणा बचाव कामात मदत करेल.”

कॅशलेस उपचार असतील
मीडिया रिपोर्टनुसार सरकार या प्रणालीद्वारे कॅशलेस उपचार देण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात ही यंत्रणा प्रभावी होण्यासाठी परिवहन मंत्रालयाने आयआयटी आणि एनआयटी सारख्या संस्थांशी करार केला आहे. जेणेकरून देशभरात रस्ते सुरक्षा यंत्रणेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

You might also like