मृत्यूनंतर २७ वर्षाचा मुलगा ठरला आठ लोकांसाठी देवदूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुअनंतपुरम । कोरोनाच्या काळात अवयवदान करणे म्हणजे एक पर्वणी असते. तिरुअनंतपुरम येथे राहत असलेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयव दान केल्यानंतर अनेकांना जीवनदान मिळू शकते. १७ जुलै ला केरळ मध्ये राहत असलेल्या अणुजीतचा मृत्यू हा ब्रेन डेड मुळे झाला होता. त्याच्या बायकोने आणि त्याच्या बहिणीने अनुजीत च्या अवयवांचे अवयवांचे दान करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो त्याच्या मृत्यूनंतर ८ लोकांसाठी देवदूत बनला आहे.

केरळ मधील कोत्तम जिल्यामधील कोट्टाकराजवळ अणुजीतचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला तालुका रुग्णालयात हलवले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला तिरुअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेज मध्ये आणलं पण त्याचा जीव धोक्यात होता म्हणून त्याला केरळ इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे त्याच्यावर एपीनियाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर त्याला ब्रेन डेड म्हणून घोषित केले.

अणुजीत च्या अचानक जाण्याने सर्वाना धक्का बसला. त्याचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्यांची पत्नी प्रिन्सी आणि त्याची बहीण अजल्या यांनी त्याचे अवयव दान करायचे असा निणर्य घेतला त्यांनुसार त्याचे डोळे, हृदय, मूत्रपिंड , लहान आतडे, आणि हात दान केले आहते. त्यामुळे इतर ८ जणांचे प्राण वाचले जावेत असा त्यांनी हा विचार केला. केरळ च्या आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी अणुजीत च्या कुटुंबियांचे आभार मानले. तसेच कुटुंबियांबद्धल संवेदना व्यक्त केल्या. या म्हणाल्या कि, ‘आत्ताच्या युगात अणुजीत हा देवदूत आहे. त्याच्या कुटुंबियांच्या निर्णयामुळे आठ जणांचे जीव वाचले आहेत. हि गोष्ट त्याच्या कुटुंबियांचे कौतुक करण्यासारखी आहे. ‘

राज्य सरकारच्या केरळ ‘ शेअरिंग ऑर्गानायझेशन सेन्टर’ साठी मृतसंजीवनी च्या माध्यमातून अवयव दान केला आहे. अणुजीतचे हृद्य ५५ वर्षाचे असलेले सानी थॉमस यांना दान करण्यात आले आहे. त्यांचावर उपचार कोची येथील लिसी हॉस्पिटल मध्ये सुरु आहेत .

मुख्यामंत्रीच्या साहाय्याने केरळ राज्य सरकारने भाड्याने घेतलेल्या पवन हंस एएस ३५ डॉल्फिन हेलिकॉप्टर ने मंगळवारी अणुजीत चे अवयव एकत्र करण्याचा अभियान राबवले होते.अणुजीत हा खाजगी क्षेत्रात ड्राइवर होता. २०१० मध्ये अणुजीत च्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात होण्यापासून बचावला होता. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले होते. अणुजीत ला तीन वर्षाचा एक मुलगा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment