Tuesday, February 7, 2023

IT छाप्यानंतर सोनू सूदकडून आयकर विभागाचा समाचार, म्हणाला-“मी तुमच्या सेवेला हजर आहे”

- Advertisement -

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. अलीकडेच त्याच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या छाप्यांदरम्यान प्रचंड टॅक्सचोरीचे सबळ पुरावे सापडले आहेत. आयकर विभागाच्या या छाप्यांच्या पथकाने मुंबई, लखनौ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे एकाच वेळी छापे घातल्याची माहिती आहे. लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि स्थलांतरित मजूर आणि कामगारांना विशेष मदत करणारा सोनू सूद आता निगेटिव्ह इमेज बनत आहेत. अनेक राजकीय पक्षांचेची लोकं त्याला लक्ष्य करत आहेत.

दरम्यान, सोनू सूदने एक मोटिवेशनल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो खूप आत्मविश्वासी दिसत आहे. ही पोस्ट त्याचा दृढ हेतू आणि सामान्य लोकांचा पाठिंबा दर्शवते. त्याने ट्वीट करताना लिहिले कि, “कठीण मार्गावरही सहजपणे चालता येते, प्रत्येक भारतीयांच्या प्रार्थनेचा परिणाम असेल.” यासोबत त्याने एक पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरच्या बॅकग्राउंडवर भारतीय ध्वजाप्रमाणे तीन रंग आहेत.

- Advertisement -

सोनू सूदने या पोस्टरमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला नेहमी तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. वेळच सांगेल. मी स्वत: ला माझ्या संपूर्ण ताकदीने आणि मनापासून भारताच्या लोकांची सेवा करण्याचे वचन दिले होते. माझ्या फाउंडेशनचा प्रत्येक रुपया एक मौल्यवान जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी खर्च केला जातो. तसेच, अनेक प्रसंगी, मी ब्रँडना जाहिरात शुल्क मानवी घटकांमध्ये वर्गीकृत करण्यासाठी प्रोत्साहित केले, जेणेकरून आपण लोकांना मदत करत राहू. ”

सोनूने पुढे लिहिले की, “मी गेल्या 4 दिवसांपासून काही पाहुण्यांची सेवा करण्यात थोडा व्यस्त आहे ज्यामुळे मी तुमची सेवा करू शकत नाही. मी पुन्हा सर्व नम्रतेने परत आलो आहे. तुमच्या सेवेत, आयुष्यभर. ” सोनूने पुढे लिहिले, “चांगले केले तर चांगलेच होईल. माझा प्रवास सुरूच आहे… जय हिंद. सोनू सूद ”

या छाप्यात आयकर विभागाला प्रचंड करचोरीचे सबळ पुरावे मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. करात फेरफार सोनू सूदच्या पर्सनल फायनान्सशी संबंधित आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, या अभिनेत्याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपले बेहिशेबी उत्पन्न वळवले आहे. आतापर्यंतच्या तपासात टीमला 20 बनावट रेकॉर्ड सापडले आहेत. आयकर विभाग आता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करत आहे.