लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून रोजी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव स्वाती रोहित पवार असे आहे. ती पुण्यातील लष्कर परिसरात आपल्या पतीसोबत राहत होती. आरोपी पती रोहित राजू पवारला दारुचे व्यसन होते. तो दारूच्या जास्त आहारी गेल्यामुळे त्याच्या हाताला नोकरी किंवा रोजगारही नव्हता. त्यामुळे आपल्या दारूची तहान भागवण्यासाठी राजू आपल्या पत्नीला त्रास देत असे. तसेच पत्नीने दारूसाठी माहेरावरून पैसे आणावे यासाठी तो मृत स्वातीचा नेहमी छळ करत होता. तसेच तो स्वातीला शिवीगाळ व मारहाणदेखील करत होता.

यामुळे पतीच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून मृत स्वातीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवाहितेला आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीसह एका महिलेविरोधात निर्मला मिसाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत स्वातीचा एक वर्षापूर्वी आरोपी रोहितसोबत विवाह झाला होता.पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment