मोदींच्या मन कि बात नंतर मुख्यमंत्री ठाकरेंची दिल की बात! वाचा ठळक मुद्दे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अक्षयतृतीये निमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. ठाकरे यांचे कोरोनाच्या काळातील सर्वच संवाद अतीशय प्रभावी ठरताना दिसत आहेत. अतिशय साधेपणाने आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद जोडत असल्याने हा संवाद खर्या अर्थाने दिलसे असल्यासारखा वाटतो आहे.

हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. रोजची संध्याकाळ आज काय काय झालं याने संपते तर येणारा दुसरा दिवस आज काय काय होणार या विचाराने सुरु होते. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मियांचे आभार मानायला हवे असं आवाहन ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे

– मुस्लीम धर्मियांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, मस्जिद किंवा रस्त्यावर नमाज पठण करण्यासाठी गर्दी करू नका.
– जे संयम पाळताय त्यातच देव आहे. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि पोलिसांमध्ये देव आहे. आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे
– भाषणादरम्यान करोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
– लॉकडाऊनमुळे आपण करोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत
– मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. कारण, प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत.
– केंद्राचं पथक मुंबईत मुक्कामी आहे. केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती
– सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
– सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा
– महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापैकी 7628 इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण, 323 मृत्यू.
-कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फळफळावळ विक्रीवर बंधन नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योगांना परवानगी दिली आहे. हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळू हळू पूर्वपदाच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत
– करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध जिंकेल

देव मंदिरात नाही तर डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांत आहे - मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Comment