रवी शास्त्री नंतर ‘हे’ 5 दिग्गज बनू शकतात टीम इंडियाचे प्रशिक्षक, त्यात परदेशी लोकांचा देखील समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रवि शास्त्रीच्या कोचिंग मध्ये एकंदरीत कामगिरी चांगली झाली असली तरी टीम इंडियाने अद्याप आयसीसीचे जेतेपद जिंकलेले नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी -20 विश्वचषकानंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी दुसर्‍याला कोच बनवता येईल. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. ही टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचली. रवी शास्त्रीनंतर टीम इंडियाचा नवा कोच कोण बनू शकेल हे जाणून घेउयात.

1- राहुल द्रविड : राहुल द्रविडच्या कोचिंग मध्ये टीम इंडिया सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. अशा परिस्थितीत, सर्वांची नजर त्याच्यावर असेल. कित्येक ज्युनिअर खेळाडू तयार करण्याचे श्रेय त्याला जाते. 2015 मध्ये राहुल द्रविडने भारत अंडर -19 टीम आणि टीम A च्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्याच्या कोचिंगचा परिणाम असा झाला की, भारत 2016 मध्ये अंडर -19 वर्ल्ड कपमध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, ईशान किशन या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

2- माईक हेसन : न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन सध्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशंस आहेत. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्रोदेखील आहे. न्यूझीलंडने हेसनच्या कोचिंग मध्ये चांगली कामगिरी केली. 2012 मध्ये तो प्रशिक्षक बनला आणि संघाने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांचा कार्यकाळ 2019 वर्ल्ड कप पर्यंत होता, परंतु त्यांनी जून 2018 मध्येच हे पद सोडले. न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी तो एक आहे.

3- वीरेंद्र सेहवाग : वीरेंद्र सेहवागने यापूर्वीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक झाले होते. सेहवाग त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखला जातो. त्याला कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. ही त्यांच्यासाठी नकारात्मक गोष्ट आहे. पण त्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत त्याला संधी मिळू शकेल.

4-टॉम मूडी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू टॉम मूडीकडे कोचिंगचा खूप मोठा अनुभव आहे. सध्या तो आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादचा डायरेक्टर ऑफ क्रिकेटर आहे. 2005 पासून तो विविध संघांना कोचिंग करत आहे. श्रीलंका नॅशनल टीम व्यतिरिक्त तो आयपीएल, कॅरिबियन प्रीमियर लीग, बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील कोचिंगशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत तेही प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहेत.

5- रवी शास्त्री: रवी शास्त्री स्वत: पुन्हा प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहेत. त्याच्या कोचिंग मध्ये संघ आयसीसीचे जेतेपद जिंकू शकला नसला तरी या संघाने कसोटीत क्रमांक 1 चे स्थान मिळविले आहे. एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. टीम इंडिया टी- 20 विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरली तर त्याला पुन्हा प्रशिक्षक बनविता येईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment