प्रसाद लाड यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणाचा तपास होणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या गुन्हाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे आता भाजप नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर तिसरे भाजप नेते आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?
2009 मध्ये महापालिकेच्या घाटकोपर विभागाकडून जलवाहिनी देखभाल, संरक्षणासाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बीव्हीजी लिमिटेड आणी प्रसाद लाड (Prasad Lad) यांची क्रिस्टल ट्रेडकॉम या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन त्यासाठी निविदा भरल्या. यानंतर या दोन कंपन्यांनी भागिदारी करार करत बीव्हीजी क्रिस्टल जाईंट व्हेंचर ही कंपनी स्थापन केली. तसेच या प्रोजेक्टचे काम करण्यासाठी अग्रवाल यांची निवड करण्यात आली. कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रॉयल्टी बीव्हीजी व क्रीस्टल या दोन कंपन्यांना मिळेल, असे या करारामध्ये लिहिण्यात आले होते. यानंतर हि निविदा पालिकेने मंजूर केली. तसेच कामाच्या खर्चाचे दीडशे कोटींचे कंत्राटही मंजूर केले. यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मोबदलाच मिळाला नसल्याची तक्रार अग्रवाल यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे.

2014 मध्ये दाखल झाला होता गुन्हा
या प्रकरणी प्रसाद लाड आणी इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आता प्रसाद लाड (Prasad Lad) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास बंद करण्यात यावा अशी मागणी करणारा सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या