ट्रम्प यांच्या स्वागतावर १२० करोड खर्च केल्यानंतर देशाला मिळाले २० करोडचे व्हेंटिलेटर; ‘या’ महिला खासदाराचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर गिफ्ट देण्याच्या प्रकरणावर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवत महुआ मोइत्रा यांनी ट्वीट केले की,”मोदीजी, ट्रम्प यांच्यासाठी पार्टिचे आयोजन करण्यात सरकारचा वेळ आणि पैश्याचा दुरुपयोग करण्याऐवजी आपण वेळीच कोरोनाचा धोका लक्षात घेतला असता तर कदाचित आपल्याला त्यांच्या या गिफ्टची गरज भासली नसती.”

त्याच बरोबर, महुआ असेही म्हणाल्या की, ट्रम्प यांनी भेट म्हणून दिलेल्या २०० व्हेंटिलेटरची किंमत ही २० कोटी रुपये असून भारताने त्यांच्या नमस्ते इंडिया कार्यक्रमासाठी १२० कोटी रुपये खर्च केले होते. महुआने मोदींना टोमणे मारत विचारले की,”सर ! तुमच्या आत्मनिर्भर मोहिमेची ही सुरुवात आहे का ?”

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स भेट म्हणून देणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला अभिमान आहे की,”भारत या आपल्या मित्रांला अमेरिका व्हेंटिलेटर भेट म्हणून देईल. आम्ही या साथीच्या कठीण काळात भारतासमवेत उभे आहोत. तसेच कोरोनाची लस तयार करण्यात आम्ही एकमेकांना मदतही करत आहोत. ट्रम्प असेही म्हणाले की, “एकत्र मिळून आम्ही कोरोनासारख्या शत्रूचा पराभव करू.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की,’अध्यक्ष ट्रम्प, या साथीचा सामना करण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, जगाला निरोगी बनवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याची आता वेळ आली आहे. यासह नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि सांगितले की,”आपल्या या निर्णयामुळे भारत-यूएसएची मैत्री आणखीनच मजबूत होईल.”

यापूर्वी भारतानेही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध अमेरिकेत पाठविले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ‘चेतावणी’नंतर भारत सरकारने मलेरियासाठी वापरण्यात येणारे हे औषध अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी कोरोना विषाणूची लस या वर्षाच्या अखेरीस किंवा त्यानंतर लवकरच बाजारात उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली आहे. रोज गार्डन येथील एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की,“ २०२० च्या अखेरपर्यंत ही लस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक विकास कार्यक्रम पुन्हा सुरू होतील अशी अशा आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment